शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी महसूलमंत्र्यांच्या नावानं जमिनीचे गैरव्यवहार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 18:21 IST

१० दिवसांपूर्वी मांजरेला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली असल्याची माहिती माने यांनी दिली.

मुंबई - माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याचे सांगून सरकारी कोट्यातून स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना चुना लावणाऱ्या संतोष दगडू मांजरे  (४८) याला पोलिसांनी सोलापूरमधून अटक केली असल्याची माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. १० दिवसांपूर्वी मांजरेला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली असल्याची माहिती माने यांनी दिली.

मांजरे हा अटक टाळण्यासाठी सोलापुरात शेतात लपून बसला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून मांजरेला अटक केली. संतोष मांजरे हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवाशी आहे. संतोष मांजरे आणि वनमाला खरात यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याचे खुशलचंद पुणेकर यांना सांगितले. पुणेकर यांना बारामतीमधील सरकारी कोट्यातील सहा एकर जमीन ५ लाख ३६ हजार रुपयांना मिळवून देण्याचे अमिष दाखवले. खरात हिने मांजरे याच्या मदतीने पुणेकर यांच्याकडून सव्वा सहा लाख रुपये घेतले होते. पैसे देऊनही जमीन न मिळाल्याने पुणेकर यांनी २०१७ मध्ये गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

संतोष मांजरे याचा पोलीस शोध घेत असताना तो सोलापुरात लपून बसल्याने पोलिसांना सापडत नव्हता. मांजरे हा शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पुणेकर यांच्याकडून घेतलेल्या पैशातून घर बांधल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी मांजरे याच्याविरुद्ध लोणंद, आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातministerमंत्रीPoliceपोलिसfraudधोकेबाजीArrestअटकSolapurसोलापूर