शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'आधी म्हणाले वेबसिरीज, घरी गेल्यावर नग्न होण्यास सांगितलं'; तरुणीची तक्रार, मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 14:10 IST

मॉडेलने २९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबई: मॉडेलची पॉर्न फिल्म बनवत इंटरनेटवर ती अपलोड केल्याप्रकरणी एका महिलेसह चार जणांवर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परदेशी ग्राहकांसाठी असलेल्या वेब-सिरीजसाठी "बोल्ड" सीन करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तक्रार तिने केल्यानंतर ही कारवाई करत एकाला अटक करण्यात आली. तर आरोपी महिलेला दीड वर्षांपूर्वी पॉर्न रॅकेटचा भाग असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. 

चारकोप पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे यास्मीन खान, अनिरुद्ध प्रसाद जांगड, अमित पासवान आणि आदित्य अशी आहेत. जांगड हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, इतर फरार आहेत. तक्रारदाराने विविध ब्रँडचे कपडे आणि कपड्यांसाठी जाहिराती केल्या आहेत. आणखी काम मिळण्याच्या आशेने तिने तिचा मोबाईल नंबर, फोटो आणि कामाची माहिती इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केली होती. मॉडेलने सांगितले की, राहुल ठाकूर याने सप्टेंबरमध्ये तिच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला आणि तिला केरशॉ नावाच्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितले ज्याने तिला राहुल पांडेकडे पाठवले. 

पांडेने मॉडेलला सांगितले की, त्यांना त्यांच्या वेब-सिरीजसाठी "मोबाइल अॅप" नावाच्या ऍप्लिकेशनसाठी अभिनेत्रीची गरज आहे. परंतु त्या व्यक्तीने "बोल्ड सीन्स" करणे आवश्यक आहे. मात्र ही वेब सिरीज भारतात प्रदर्शित होणार असल्याचे समजल्यानंतर ही ऑफर नाकारल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. पांडेने ऑक्टोबरमध्ये मॉडेलकडे पुन्हा प्रस्ताव देत अॅपवर परदेशी क्लायंटसाठी वेब-सिरीज रिलीज केली जाईल असे सांगितले. त्यासाठी तिला ५० हजार रुपये देण्याचेही नक्की झाले. 

पांडेच्या विनंतीनुसार, ती ८ ऑक्टोबर रोजी मालाड स्टेशनवर जांगडला भेटली आणि भाबरेकर नगर येथील एका उंच इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नेण्यात आले. फ्लॅटच्या आत, तक्रारदाराला दोन यास्मिन आणि मेकअप आर्टिस्ट तसेच दोन पुरुष भेटले. यास्मीन सीन शूट करत होती आणि तिने मॉडेलला नग्न होण्यास सांगितले. जेव्हा तिने नकार दिला आणि निघून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यास्मीनने तिला १५ लाख रुपयांच्या मानहानीचा खटला भरण्याची धमकी दिली आणि भीतीपोटी तिने शूट पूर्ण केल्याचे पोलिसांना सांगितले. 

शूटिंगनंतर तिला १० हजार रुपये मानधन मिळाले होते. मात्र २६ नोव्हेंबर रोजी, एका ओळखीच्या व्यक्तीने मॉडेलला सांगितले की तिचा व्हिडिओ एका पॉर्न साइटवर आहे आणि तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये देखील शेअर केला जात आहे. तिने यास्मीनला व्हिडिओबद्दल विचारले असता तिने अनभिज्ञ असल्याचे सांगितले. मॉडेलने यास्मीनला व्हिडिओ हटवण्यास सांगितले तेव्हा तिने तिचे कॉल घेणे बंद केले. अखेर मॉडेलने २९ नोव्हेंबर रोजी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबईPoliceपोलिस