शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आनंदवन’ विरोधात पोलिसांत तक्रार; भेदभावाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 02:26 IST

तक्रारदाराने गैरव्यवहार केल्याचे व्यवस्थापनाने दिले स्पष्टीकरण

वरोरा (चंद्रपूर) : कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी डॉ. बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपणांस हीनदर्जाची वागणूक मिळाल्याची तक्रार आनंदवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजू सौसागडे यांनी पोलिसांत दिली आहे. या तक्रारीमुळे मागील काही दिवसांपासून असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कराजगी व अंतर्गत व्यवस्थापक गौतम कराजगी यांच्याविरूद्ध या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कारणावरून घराबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला, बळजबरीने घर खाली करण्यात आले. तसेच माहितीच्या अधिकारात का अर्ज केला, म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सौसागडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार मडावी यांनी सांगितले.

दरम्यान, गौतम कराजगी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. राजू सौसागडे याने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याने त्याला व त्याच्या पत्नीस कामावरून काढून टाकले आहे. राजू हा नेहमी महारोगी सेवा समिती व आनंदवन ग्रामपंचायतीविरुध्द तक्रारी करीत असतो. अ‍ॅट्रासिटी कायद्याची धमकी देत असतो, असे कराजगी यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, राजू सौसागडे व त्याच्या कुटुंबास गावाबाहेर काढण्याचा ठराव आनंदवन ग्रामपंचायतीने विशेष सभेत मंजूर केला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली होती.बाबांच्या काळापासून आनंदवनात जातीपातीचा भेदभाव होत नाही. सौसागडे हे संस्थेच्या तत्वाचे पालन करीत नाही. तक्रारी करून त्रास देतो. -गौतम कराजगी, अंतर्गत व्यवस्थापक, महारोगी सेवा समिती, आनंदवन

टॅग्स :Policeपोलिस