शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांची ५० हजार पोलिसांवर कौतुकांची थाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 21:16 IST

निवडणूकीतील सुरळीत बंदोबस्ताबाबत बक्षीस; सेवा पुस्तकातही नोंद होणार

ठळक मुद्देकार्यवाही तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारापर्यंत संबंधित पोलीस उपायुक्तांनी बक्षीस द्यावयाची आहेत

मुंबई - महानगरात विधानसभा निवडणूका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या ५० हजारावर मुंबईपोलिसांची पाठ आयुक्त संजय बर्वे यांनी कौतुकाने थोपाटली आहे. निवडणूकीच्या काळात कार्यरत असलेल्या अधिकारी व अंमलदारांची चांगली कामगिरी, म्हणून सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूका किरकोळ अपवाद वगळता सुरळीतपणे पार पडल्या. आचारसंहिता लागू झाल्यापासून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांच्या कडून विशेष नियोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे २१ ऑक्टोबरला मतदान व २४ ऑक्टोबरला मतमोजणी दिवशी अतिरिक्त बंदोबस्तत तैनात करण्यात आलेला होता. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील निवडणूका सुरळीतपणे पार पडल्या. त्यामुळे या कालावधीत कार्यरत असलेल्या अधिकारी व अंमलदारांना बक्षीस देण्याचा निर्णय आयुक्त संजय बर्वे यांनी घेतला आहे. या कालावधीत गैरहजर, वैद्यकीय रजेवर असलेल्या अधिकार व अंमलदाराना चांगली कामगिरी म्हणून त्यांच्या सेवा पुस्तिकेवर (सर्विस बुक) नोंद केली जाणार आहे. त्याचा फायदा त्यांना भविष्यातील विशेष सन्मान, शौर्यपदकासाठी पाठविल्या जाणाऱ्या प्रस्तावासाठी होईल, त्याचप्रमाणे बढती व बदलीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारापर्यंत संबंधित पोलीस उपायुक्तांनी बक्षीस द्यावयाची आहेत, तर पीएसआय ते वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत अप्पर आयुक्तांकडे तर सहाय्यक आयुक्तांना सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही बक्षीसे देणार आहेत, त्याबाबतची कार्यवाही त्वरित करुन कार्य अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.गणेशोत्सव बंदोबस्ताबद्दल अद्याप बक्षीस नाहीपोलीस आयुक्तांनी गणेशोत्सव, मोहरमच्या कालावधीत पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल १६ सप्टेंबरला बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. मात्र काही सहआयुक्त, अप्पर आयुक्त व उपायुक्तांनी त्यांची कार्यवाही केलेली नाही. त्याबाबत अधिकारी-अंमलदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आयुक्त बर्वे यांची दखल घेत संबंधित अहवालाची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेPoliceपोलिसMumbaiमुंबईcommissionerआयुक्त