शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र दरोडेखोरांसोबत पोलिसांची झटापट; डोळ्यात स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 06:16 IST

२६ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपीनी कुरार परिसरातील भूषण वॉइन शॉपचे शटर उचकटून ४५ हजार रुपयांच्या ऐवजावर लुटारूने हात साफ केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गस्तीदरम्यान सशस्त्र दरोड़ेखोरांच्या हालचाली पोलिसांनी हेरल्या. त्यांचा पाठलाग करताच, चौघांंनी  पळ काढ़ला. पोलीस शिपायाने एकाचा पाठलाग करत त्याला पकड़ले. दोघांमध्ये झटापट सुरु झाली. लुटारूने जवळील स्प्रे पोलिसाच्या डोळ्यात मारून त्याला मारहाण सुरु केली. मात्र, पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत शिपायाने त्याला पकड़ून ठेवले. अखेर, घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने त्याला ताब्यात घेत, शिपायाला रुग्णालयात दाखल केले. हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटणारी ही घटना कुरारमध्ये घडली आहे.

 २६ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपीनी कुरार परिसरातील भूषण वॉइन शॉपचे शटर उचकटून ४५ हजार रुपयांच्या ऐवजावर लुटारूने हात साफ केला आहे. त्यानुसार, गुह्याची कार्यपद्धतीवरून कुरार पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण पथकाने गस्त वाढवून आरोपीचा शोध सुरु केला. यादरम्यान ३० डिसेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक पथकाचे पोलिस शिपाई विक्रम वेदांते यांना मालाड पूर्वेकडील आदर्श नगर येथे एका ऑटोमध्ये बसलेले काही जण गुह्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबत, अन्य अधिकाऱ्यांंना माहिती देत घटनास्थळी येण्यास सांगितले. यादरम्यान रिक्षातील पाच जणांना हटकताच त्यापैकी चौघांंनी रिक्षा सोडून पळ काढ़ला. तर, एकाचा पाठलाग करून त्याला पकड़ले. 

यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. दरम्यान आरोपीने त्याच्याकडील पेपर स्प्रे त्यांच्या डोळ्यात मारत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदांते यांनी त्याला पकड़ून ठेवले. वेदांते यांच्या डोळ्यात जळजळ होत असल्याचा फायदा घेत आरोपीने त्यांना मारहाण करत स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदांते यांनी ही प्रतिकार करत त्याला पकड़ून ठेवले. हारून जैदुल सरदार (३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मालवणीचा रहिवासी आहे. वेदांते यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी नितीन गिजे आणि अंमलदार यांनी कारवाई केली. सरदारच्या चौकशीतून त्याचा पळून गेलेला साथीदार राज दिवाकर (२४) याला अटक केली आहे. 

मुंबईत ४६ घरफोड्यासरदार विरुद्ध मुंबईत घरफोडी, चोरीप्रकरणी ४६ गुन्हे नोंद आहेत. चारकोप, गोरेगाव, कुरार, अंबोली, मालाड, मालवणी, दिंडोशी, कांदीवली, कस्तुरबा, जोगेश्वरी, एमआयडीसीसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

बालविवाहाच्या गुह्यांतही अटकराज दिवाकर विरुद्ध मालाड, कांदीवलीसह मालवणी पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिस