शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या हत्येनंतर ‘पोस्ट’ केल्या डिलिट; पोलिसांनी तपासले विशाल गवळीचे सोशल मीडिया अकाउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:51 IST

...आपली ओळख पटू नये यासाठी त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली.

कल्याण : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याने घटनेनंतर लगेच त्याचे सोशल मीडिया अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलिट केल्या. आपली ओळख पटू नये यासाठी त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली.

गवळीच्या घरात २२ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता पीडित मुलगी आढळून आली. त्याने मुलीला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह एका बॅगेत भरून पत्नी आणि त्याचा रिक्षाचालक मित्र याच्या मदतीने बापगाव येथील निर्जनस्थळी फेकून दिला. त्यानंतर पसार होण्याआधी एका बारमधून दारू विकत घेतली. बायकोला घरी साेडून तो पसार झाला. यादरम्यान त्याने त्याचे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील सगळे फोटो, चॅट डिलिट केले. 

गवळीचे सोशल मीडिया अकाउंट पोलिसांनी तपासले असता, त्यावर कोणताच तपशील, माहिती, फोटो उपलब्ध नव्हते. त्याच्या व्हॉटसॲपवरील डीपीही त्याने हटविला. दाढी काढून त्याला पसार व्हायचे होते. त्यामुळेच त्याने सोशल मीडियावरील पोस्ट डिलिट केल्या. ज्यामुळे कुणीही आपल्याला ओळखणार नाही. अखेर पोलिसांनी त्याचा माग काढत शेगावमधून  त्याच्या मुसक्या आवळल्या.

महेश गायकवाड समर्थनाची पोस्ट कधी केली?-  विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप शिंदेसेनेचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केला. त्यानंतर भाजपने विशाल गवळीच्या समर्थनार्थ केलेली फेसबुक पोस्ट दाखवून तो महेश यांचाच समर्थक असल्याचे सांगितले. -  आराेपीने त्याचे फेसबुक अकाउंट हत्येच्या घटनेनंतर डिलिट केले तर ही पोस्ट भाजपला कुठून मिळाली, असा प्रश्न  गायकवाड यांनी उपस्थित केला. -  याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. भाजपने गवळीची गायकवाड यांच्याशी दोस्ती असल्याची फेसबुक पोस्ट दाखवली असली तरी ती पोस्ट गवळीने कधी केली? याचा पोलिस तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस