शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

भ्रष्टाचारात पोलीसच सर्वात पुढे! गेल्या वर्षात एसीबीच्या सापळ्यात १०७६ बाबू अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:51 IST

Crime News : गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक २५५ पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले तर त्याखालोखाल महसूलचे २५२ जण पकडले गेले.

- सुनील पाटील

जळगाव :  भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही लढे उभारले तरी तो कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. पोलीस आणि महसूल या दोन विभागात जणू भ्रष्टाचारात स्पर्धाच लागली आहे. गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक २५५ पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले तर त्याखालोखाल महसूलचे २५२ जण पकडले गेले. ७६४ सापळ्यांमध्ये १०८६ जणांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यात सर्वाधिक वर्ग ३ च्या ५८९, वर्गच्या १०९ व वर्ग १ च्या ६९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी व्हावा, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जनजागृतीपर पंधरवाडा राबविण्यात येतो. लाचखोरांविरुद्ध वारंवार सापळे लावून कारवाया झालेल्या आहेत. काही प्रकरणात शिक्षाही झालेल्या आहेत, असे असतानाही लाचखोरीच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. शिपायापासून तर कार्यालय प्रमुखापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पकडले गेले आहेत. बांधकाम विभागातही १० सापळे यशस्वी झाले असून १७ जणांना अटक झाली आहे. आरटीओत देखील १५ जणांना अटक झाली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त माया जमविल्याप्रकरणी राज्यात अपसंपदेचे ७ गुन्हे दाखल झाले असून ११ जणांना त्यात अटक झाली आहे. 

१८ गुन्ह्यात १९ जणांना शिक्षालाचेच्या प्रकरणात मागील वर्षी १८ गुन्ह्यांमध्ये दोषसिध्द झाले असून १९ जणांना शिक्षा झालेली आहे. त्यात सर्वाधिक महसूलचे ७ व पोलीस विभागातील ५ जणांचा समावेश आहे. सहकार विभागाच्याही ३ जणांना शिक्षा झालेली आहे. त्यात वर्ग १ च्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या सर्वांना ३ लाख ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

एकूण सापळे : ७६४एकूण अटक :  १०७६सापळा रक्कम हस्तगत : २,६४,१९,८८१

कोणत्या विभागात किती लाचखोर?पोलीस : २५५महसूल : २५२पंचायत समिती : ७८महापालिका : ७७जिल्हा परिषद : ६३शिक्षण : ४१वन विभाग : २९इतर : २८१

वर्गनिहाय अटक आरोपीवर्ग १ : ६९वर्ग २ : १०८वर्ग ३ : ५८९वर्ग ४ : ४९इलोसे : ९६खासगी व्यक्ती : १६५

नव्या वर्षात दोन महिन्यात १०४ सापळेपरिक्षेत्र     गुन्हे      अटक आरोपीमुंबई         १०         १५ठाणे         १२         १५पुणे          १९          २६नाशिक     २१         ३०नागपूर      ०७         १०अमरावती  ०७         ०८औरंगाबाद  १४         १७नांदेड         १४          १८एकूण       १०४         १३९

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी