शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भोळाभाबडा चेहरा पाहून लिफ्ट दिली, पोलिसालाच लुटून ती पसार झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 12:29 IST

भोळाभाबडा चेहरा पाहून एका तरुणीला लिफ्ट देणे पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.

फरिदाबाद -  भोळाभाबडा चेहरा पाहून एका तरुणीला लिफ्ट देणे पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. साध्याभोळ्या दिसणाऱ्या या तरुणीने गाडीत बसताच आपले खरे रूप दाखवत पोलीस अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करीन अशी धमकी देत या तरुणीने त्याच्याकडील रोख रक्कम आणि एटीएममधून बँक खात्यात असलेली रक्कम काढून घेतली आणि पोबारा केला. दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर एनआयटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय चरण सिंह हे पोलिसांच्या मिसिंग विभागात तैनात आहेत. शनिवारी दुपारी  ते एनआयटी-5 मधील नीलम चौकजवळ एका ज्युसच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांना एक तरुणी भेटली. तिने त्यांच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या पतीची तब्येत बिघडली असून, आपल्याला तातडीने वल्लभगड येथे जायचे आहे, असे सांगितले. तिचा साधाभोळा चेहरा पाहून सिंह यांनी तिला लिफ्ट देण्याचे मान्य केले.  मात्र कार काही अंतरावर पोहोचल्यानंतर या तरुणीची देहबोली बदलली. तिने या पोलीस अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करून आरडाओरडा करण्याची धमकी दिली.तिच्या या वागण्यामुळे पोलीस अधिकारी असलेले सिंह गोंधळले. या तरुणीने त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांचे डेबिट कार्ड घेऊन एटीएममधूनही रोख रक्कम काढली. तसेच आडवाटेला कार थांबवून पसार झाली. दरम्यान, या तरुणीचे नाव सुनीता असल्याचे पीडित अधिकाऱ्याने सांगितले असून, तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस