शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"आईचं छोट्या बहिणीवरच जास्त प्रेम"; नाराज महिलेने स्वत:च्या घरातच केली लाखोंची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 12:14 IST

श्वेता असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी महिलेने बुरखा घालून हा गुन्हा केला.

दिल्लीतील बिंदापूर भागात आपल्याच आईच्या घरात चोरी करणाऱ्या महिलेला द्वारका पोलिसांनी अटक केली आहे. श्वेता असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी महिलेने बुरखा घालून हा गुन्हा केला. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी महिलेकडून दागिने, साडेनऊ हजार रुपये आणि बुरखा जप्त केला आहे.

डीसीपी द्वारका अंकित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी सेवक पार्क उत्तम नगरमध्ये राहणारे कमलेश यांनी त्यांच्या घरात चोरीची तक्रार दाखल केली होती. घरातून लाखोंचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. या प्रकरणी बिंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. द्वारका जिल्ह्यातील अँटी व्हर्गलरी सेलचे प्रभारी विवेक मंदोला यांच्या टीमला घराचा मुख्य दरवाजा व कपाटाचं कुलूप तुटलेलं आढळून आलं नाही.

घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये काळ्या बुरख्यात एक महिला संशयास्पदरीत्या घरात शिरताना दिसली. टेक्निकल सर्व्हिलान्सच्या मदतीने पोलिसांनी या महिलेची ओळख पटवून तिला पकडले. ती तक्रारदार महिलेची मोठी मुलगी असल्याचं निष्पन्न झालं. आरोपी मुलीची चौकशी केली असता, तिने उघड केले की, तिची आई तिच्या लहान बहिणीवर जास्त प्रेम करत होती. त्यामुळे तिच्या लहान बहिणीबद्दल मत्सर आणि द्वेषाच्या भावना वाढत गेल्या. दरम्यान, काही कर्जही झालं. यामुळे तिने आईच्याच घरी चोरीचा कट रचला.

महिलेने आपलं घर शिफ्ट केलं. घर बदलण्याच्या बहाण्याने तिने आईला घरी बोलावलं. त्यानंतर आईच्या घराच्या चाव्या चोरल्या. भाजी आणण्याच्या बहाण्याने ती घराबाहेर पडली. तिने उत्तम नगर पश्चिम येथील शौचालयात कपडे बदलले आणि बुरखा घातला. त्यानंतर या घटनेनंतर ती पुन्हा शौचालयात आली, कपडे बदलून घरी गेली. तिने हे दागिने एका ज्वेलर्सला विकल्याचं सांगितलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी