शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरटा गजाआड; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 18:56 IST

चोरट्याकडून एक लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा  मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देआठ गुन्हे उघडकीस आले असून मोबाईल, रोकड, मंगळसूत्र असा १ लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.फुटेज अंधुक असल्याने पोलिसानी आपले कसब पणाला लावत हालचालींची लकब व शरीर यष्टी वरून संशयित आरोपीचा शोध

कल्याण - ६४ वर्षीय वयोवृद्ध महिलेकडील बॅग हिसकावून पळ काढलेल्या फैजान शेख (२७, रा. गोविंदवाडी) या चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी मोठ्या शिताफीने २४ तासात गजाआड केले आहे. या चोरट्याकडून एक लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण उपस्थित होते.पश्चिमेतील टिळक चौकातून सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालत जाणाऱ्या ट्युशन टीचर रोहिणी देवडीकर (६४) यांची रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग हिसकावून एका दुचाकीस्वाराने लांबवली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सानप व सहकाऱ्यांनी घटनास्थळासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक तरुण ही बॅग घेऊन जात असताना आढळला. मात्र, फुटेज अंधुक असल्याने पोलिसानी आपले कसब पणाला लावत हालचालींची लकब व शरीर यष्टी वरून संशयित आरोपीचा शोध घेत खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गोविंदवाडी येथे राहणाऱ्या फैजाण शेख याला अटक केली. पोलीस तपासादरम्यान फैजाण कडून आठ गुन्हे उघडकीस आले असून मोबाईल, रोकड, मंगळसूत्र असा १ लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसArrestअटकkalyanकल्याण