पिंपरी : रस्त्यावरून घरी निघालेल्या एका मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास तळेगाव दाभाडे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. आरोपीला ट्रकसह जळगावमधील मुक्ताईनगर येथून अटक करण्यात आली आहे. करमवीर गुलाब जैसवार (वय ३०, रा. मानकोली फाटा, दिवे गाव, भिवंडी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित मुलगी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील गहुंजे गावाच्या नजीक असणाऱ्या पुलावरून घरी एकटीच चालली असल्याचे आरोपीने पाहिले. याप्रसंगी त्याने पीडित मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिचे कपडे फाडून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात चिंतेचे वातावरण होते. आरोपीला तत्काळ अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूहोते. घटनेनंतर आरोपी पसार झाला. गुन्हा उडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी तपास सुरूकेला. त्यासाठी आजूबाजूच्या परिसरात परराज्यातून आलेल्या मजुरांची चौकशी केली. यातून काही माहिती मिळाली नाही. पुढे टोलनाक्यावरून काही महत्त्वाचे धागेदोरे हाताशी आले. आरोपी एका कंपनीच्या ट्रकवर काम करत असल्याची माहिती मिळाली. तो ट्रक नागपूरला रवाना झाला असल्याचे सांगण्यात आले. शेवटी आरोपी करमवीरला मुक्ताईनगर येथून अटक करण्यात आली. त्याला विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चिंचकर, पोलीस नाईक अतिश जाधव, पोलीस हवालदार सतीश मिसाळ, राम बहिरट यां नी केली.
कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 13:14 IST
आरोपीने घरी निघालेल्या एका मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.
कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठळक मुद्देन्यायालयाचा आरोपीला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश