शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पत्नीची गळा चिरून हत्या करणाऱ्या पतीला केली अटक   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:10 IST

आरोपी पतीसोबत रिताचे नेहमी पैसे देण्यावरून वादविवाद होत असत. याकारणावरून त्यांच्या खटके उडाले आणि ही हत्या झाली

ठळक मुद्देवडाळा टी. टी. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र पोलीस कातडं कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.  आरोपीने दुसऱ्या पत्नीची हत्या केली असून मृत पत्नीचे नाव रिता जैस्वार असं आहे.

मुंबई - वडाळ्यातील संगम नगर परिसरात गेल्या शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली होती. संगम नगर येथील झोपडपट्टीत पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर फरार असलेल्या आरोपी पाटील वडाळा टी. टी. पोलिसांनी नवी दिल्ली येथून अटक केली आहे. अटक आरोपी पतीचे नाव फझुल रहेमान कुरेशी उर्फ कप्तान कुरेशी असं आहे. आरोपीने दुसऱ्या पत्नीची हत्या केली असून मृत पत्नीचे नाव रिता जैस्वार असं आहे. आरोपी पतीसोबत रिताचे नेहमी पैसे देण्यावरून वादविवाद होत असत. याकारणावरून त्यांच्या खटके उडाले आणि ही हत्या झाली अशी माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शेळके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

रिता हिचे पतीसोबत नेहमी पैसे देण्याच्या कारणावरून वादविवाद होत असत. त्यामुळे रिता वडाळा येथे आपल्या आईकडे राहण्यास आली होती. फझुल हा दुसरी पत्नी रितासोबत दिवा येथे राहत होती. तर फझुलची पहिली पत्नी विक्रोळी येथे दोन मुलांसह राहते. वादविवादानंतर फझुल हा वडाळा येथे रिताकडे आला आणि तिचा गळा कापून हत्या करून फरार झाला होता. हत्या करून फझुलने विक्रोळी, मुंब्रा आणि नंतर दिल्ली गाठली. आरोपीचे नातेवाईक दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राहत असून त्यांच्याकडून पोलिसांनी इत्यंभूत माहिती घेऊन आरोपीचा पाठलाग करून दिल्लीतील चांदबाग भजनपुरा येथून फझुलला अटक करण्यात आली. वडाळा टी. टी. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र पोलीस कातडं कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.  

 

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिस