शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पहिली सोडली, दुसरीशी सूत, तिसरीला पळविली; तीन बायकांच्या आधुनिक ‘लखोबा’स ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:29 IST

सुभाष फकिरा राठोड (४१, मूळ रा. पोखर्णी, जि. परभणी, ह.मु. इंदिरानगर) असे आरोपीचे नाव आहे

छत्रपती संभाजीनगर - लग्न केलेली बायको चार मुलांसह सोडून दिली. त्यानंतर दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. तिच्यापासून एक मुलगी झाली. ते कमी म्हणून की काय त्याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले. तिलाही याच्यापासून एक मुलगा झाला. शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) या आधुनिक ‘लखोबा लोखंडे’स बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली. 

सुभाष फकिरा राठोड (४१, मूळ रा. पोखर्णी, जि. परभणी, ह.मु. इंदिरानगर) असे आरोपीचे नाव आहे. येत्या ५ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या अल्पवयीन मुलीस त्याने २१ सप्टेंबर २०२१ रोजी पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर  ठाण्यात गुन्हा नोंदविला. गुन्ह्याचा तपास १६ जून २०२२ रोजी ‘एएचटीयू’कडे सोपविला.  या पथकाने बारकाईने तपास करीत मुलीचा शोध घेत राठोड यास बेड्या ठोकल्या. मुलीला पळविले तेव्हा तिचे वय १६ वर्षे होते. राठोडपासून तिला मुलगा झाला. सध्या तो पाच महिन्यांचा आहे. मुलीचा शोध लागल्यानंतर तिला पुंडलिकनगर पोलिसांकडे सोपविले आहे. 

पहिल्या दोन असताना तिसरी आणलीसुभाष राठोडचा अधिकृत विवाह झालेला आहे. त्याला विवाहाच्या पत्नीपासून तीन मुली, एक मुलगा आहे. ही महिला मुलांसह माहेरी राहते. त्यानंतर दुसरीला एक मुलगी आहे. नंतर तिसरी अल्पवयीन मुलगी आणली. तिलाही राठोडपासून एक मुलगा झाला. या दोघी एकत्रच राहत होत्या हे विशेष.

निराधार मुलीस ओढले जाळ्यातपीडित अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांचे निधन कोरोनाच्या काळात झाले. त्यानंतर मुलगी आजीकडे राहत होती. फुलांचे गजरे विकून आलेले पैसे आजीच घेत होती. त्यातच आजी तिला त्रासही  देत होती. याचा फायदा घेत ४१ वर्षांच्या राठोडने १६ वर्षांच्या मुलीला मदत करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी