शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

मित्रानेच फोडले भोंदूबाबाचे बिंग; कॅन्सरच्या नावाखाली ३२ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 20:18 IST

अखेर पवन पाटीलला अटक करण्यात आली, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

डोंबिवली:  करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रूपयांची फसवणूक करणा-या पवन बापुराव पाटील (वय 28) या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराला करणी काढण्याबरोबरच कॅन्सर उपचाराच्या नावाखाली गंडा घातला गेला आहे.            

तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे करणी काढण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगत पवनने कळवा येथे राहणा-या प्रियंका राणेसह डोंबिवलीतील तीच्या आईच्या बँक खात्यातून 31 लाख 6 हजार 874 रूपये वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाईनद्वारे ट्रान्सफर करवून घेतले होते. त्याचबरोबर 1 लाख 9 हजार रूपये किंमतीच्या भेटवस्तूही त्याने घेतल्या. फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच प्रियंकाने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. दरम्यान याची खबर पवनला लागू न देता प्रियंकाने त्याला  डोंबिवलीत बोलावून घेतले आणि तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पवन हा अविवाहीत असून तो त्याच्या जळगावच्या गावी दरबार भरवायचा अशीही माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान पोलिस निरिक्षक सुरेश सरडे यांचे पथक अधिक तपासासाठी जळगाव येथे रवाना झाल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

वडिलांचा आजार बरा करतोप्रियंकाच्या वडिलांना कॅन्सर होता. मला दैवी शक्ती प्राप्त आहे. त्यामुळे माझ्या उपचाराने तुमचे वडील कॅन्सरमुक्त होतील असे पवनने तीला सांगितले आणि उपचारासाठी काही पैसे घेतले. परंतू वडील त्या आजारातून बरे झाले नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला. कोणी तरी तुमच्या वर करणी केली आहे हे सांगून पवनने प्रियंकाचा विश्वास संपादन करीत तिच्याकडून पुन्हा पैसे घेतले. त्याने या कुटुंबियांकडून जवळपास 32 लाख रुपये उकळले आहेत.मित्रानेच फोडले बिंगपवनच्या मित्रानेच त्याचे बिंग फोडत प्रियंकाला त्याच्या बनवेगिरीची माहीती दिली. त्याचबरोबर कोपरखैरणे येथील एका महिलेकडूनही तीला सर्वकाही सांगण्यात आले. तेव्हा प्रियंकाने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली.

टॅग्स :fraudधोकेबाजी