शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:47 IST

सार्वजनिक ठिकाणी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणाविरोधात सातत्याने तक्रारी येत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाजारात येणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करत होता आणि त्यांना पाहून अश्लील इशारे करत होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमके काय घडले?भदोही येथील कटरा बाजार परिसरात हा प्रकार घडला. आरोपी अनुज कुमार गुप्ता (मूळ रा. सराय लोका गाव, जिल्हा जौनपूर) हा बाजारात आलेल्या महिलांना सातत्याने त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महिलांवर अश्लील आणि असभ्य टिप्पणी करणे, त्यांना पाहून अश्लील हावभाव करणे अशा त्याच्या कृतींमुळे स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. या संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

पोलिसांची कारवाईया तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तातडीने पाऊले उचलली. रविवारी संध्याकाळी, अनुज कुमार गुप्ता महिलांना अश्लील हावभाव करताना दिसला. ही माहिती मिळाल्यानंतर, अँटी रोमियो स्क्वॉडच्या दोन महिला सदस्य, हेड कॉन्स्टेबल पूनम राय आणि कॉन्स्टेबल प्रेमलता यांना साध्या वेशात परिसरात तैनात करण्यात आले. त्यांनी स्वतः परिस्थितीची पाहणी केली आणि आरोपीच्या कृत्यांची खात्री केली.

आरोपी अनुज कुमार गुप्ता याने साध्या वेशातील महिला पोलिसांनाही पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

गुन्हा दाखलहेड कॉन्स्टेबल पूनम राय यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, अनुज कुमार गुप्ता विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश