शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 18:09 IST

Crime News in Bhiwandi : शांतीनगर पोलिस ठाण्याच्यावतीने पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत परिसरातील महिलांची बैठक घेण्यात आली. 

ठळक मुद्देबैठकीकरिता शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह महिला सपोनि फडतरे, पोउनि जाधव व परिसरातील तब्बल ८० ते १०० महिला व पुरुष उपस्थित होते.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी ठाणे पोलिस आयुक्त यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शहरातील वाहतूक कोंडी, नशेच्या पदार्थांची अवैध विक्री, नकली व एक्सपायरी संपलेल्या अन्न पदार्थांची विक्री तसेच भिवंडीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता महिला सुरक्षा या विषयांबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आ.रईस शेख यांनी केलेल्या मागणीनुसार शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य साधून शांती नगर पोलिस ठाणे हद्दीतील नुरीनगर पहाडी, गणेश मंदिर जवळ वार्ड क्रमांक ३ या ठिकाणी शांतीनगर पोलिस ठाण्याच्यावतीने पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत परिसरातील महिलांची बैठक घेण्यात आली. 

सदर बैठकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी आपल्या मुलांना शिक्षण देणेकरीता प्रथम प्राधान्य देण्यात यावे महिला व मुलींवर अत्याचार होत असल्यास कोणतीही भीती मनात न बाळगता महीलांनी तक्रार देण्यास पुढाकार घ्यावा, आपले परिसरात जर कोणी महिलांची छेडछाड करीत असेल किंवा नशा करून महिलांना त्रास देत असल्यास त्याबाबत आपण महिला पोलिस अधिकारी फडतरे व जाधव यांना संपर्क करावा त्याकरिता उपस्थितांना महिला अधिकारी यांचे मोबाईल नंबर देखील देण्यात आले. तसेच परिसरातील बेकायदेशीर नशेचे पदार्थ विक्री करणारे तसेच महिलांची छेडछाड करणारे लोकांबाबत माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची त्यांना शाश्वती देण्यात आली. आपल्या परिसरात जर कोणी बेकायदेशीररित्या नशेचे पदार्थ विक्री करत असल्यासचे निदर्शनास आल्यास आपण तात्काळ पोलीस ठाणेशी संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. तसेच करोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी स्वतःची तसेच आपले कुटुंबीयांची काळजी घ्यावी मास्कचा सतत वापर करावा, साबणाने हात वारंवार धूवावे, सँनीटायझरचा वापर करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे या व इतर सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीकरिता शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह महिला सपोनि फडतरे, पोउनि जाधव व परिसरातील तब्बल ८० ते १०० महिला व पुरुष उपस्थित होते.

भिवंडीतील वाहतूक कोंडी, ड्रग्स विक्रीची समस्येपायी आ. रईस शेख यांनी घेतली ठाणे पोलिस आयुक्तांची भेट

 

टॅग्स :PoliceपोलिसbhiwandiभिवंडीMLAआमदार