शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Bribery case : सकाळी घेतली प्रतिज्ञा, मध्यरात्री स्वीकारली लाच; 'शाहूपुरी'चा पोलीस गजाआड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 06:13 IST

Bribery case : तक्रारदाराने विकलेली मोटारकार अपुऱ्या व्यवहारामुळे त्याने परत मिळण्यासाठी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला.

कोल्हापूर : ‘लाच घेणार नाही’,अशी सकाळी प्रतिज्ञा घेतली अन् रात्रीच पाच हजार रुपयांची लाच घेतली. लाच घेताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचा अंमलदार सागर इराप्पा कोळी (वय ४६, रा. श्रीरामनगर, उचगाव, ता. करवीर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वादातील कार परत मिळवून दिल्याबद्दल तक्रारदाराकडे संबंधिताने १५ हजार लाचेची मागणी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

मंगळवारपासून भ्रष्टाचारविरोधी दक्षता जनजागृती सप्ताहाला प्रारंभ झाला. यासाठी सकाळी जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयात लाच घेणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही अशी प्रतिज्ञा सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली आणि त्याच रात्री लाचखोर पोलिसाला गजाआड व्हावे लागले. दरम्यान, तक्रारदाराने विकलेली मोटारकार अपुऱ्या व्यवहारामुळे त्याने परत मिळण्यासाठी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मोटारीबाबत संबंधिताशी चर्चा केल्यानंतर मोटारकार पोलीस ठाण्यात आणून लावली. त्यांतर ती मूळ मालकाला परत दिली. 

मोटार परत मिळवून दिल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यातील शिपाई सागर कोळी याने मूळ मालकाकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दहा हजार रुपये सोमवारी घेतले. संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पथकाने रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात सापळा रचला. त्यावेळी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई सागर कोळी हा जाळ्यात अडकला.

रात्री दक्षता अन् मध्यरात्री गाफीलतासागर कोळी याची ड्युटी मंगळवारी रात्री नऊ वाजता सुरू झाली. त्यावेळी तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला; पण तेथे गर्दी असल्याने त्याला मध्यरात्री बारा वाजता रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे मध्यरात्री साडेबारा वाजता लाच देण्यासाठी पुन्हा आले. त्यावेळी लाच स्वीकारताना सागर कोळीला पकडले.

संशयितांची घरझडतीदरम्यान, बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी पथकासह लाचखोर पोलीस सागर कोळी याच्या उचगावमधील भाड्याच्या घराची झ़डती घेतली. पण त्याठिकाणी काही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे समजते. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी