शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:28 IST

सामन्याआधी प्रशासनाला या स्टेडिअमला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली. 

एक अयशस्वी प्रेम कहाणी या थराला जाऊ शकते ज्याचा कुणी विचारही केला नसेल. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे चेन्नईतून समोर आले आहे. एका युवतीने सहकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी असं सायबर जाळे टाकले ज्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणाही हैराण झाली. रेने जोशिल्दा असं या युवतीचे नाव असून ती एक रोबोटिक्स एक्सपर्ट आहे. एका नामांकित कंपनीत ती कामाला आहे. एकतर्फी प्रेमातून तिने तिचा सहकारी दिविज प्रभाकर याला जेलमध्ये पोहचवण्याचं षडयंत्र रचले. तिने दिविजच्या नावाने बनावट ईमेल आयडी बनवून देशातील १२ राज्यातील पोलिसांना २१ पेक्षा अधिक बॉम्बची धमकी असणारे ईमेल पाठवले. 

पोलिस तपासात समोर आले की, रेने दिविजवर प्रेम करत होती परंतु फेब्रुवारी २०२५ रोजी दिविजने लग्न केले. त्यामुळे रेनेला प्रचंड राग आला. तिने दिविजला धडा शिकवायचा असा चंग बांधला. त्यामुळे रेनेने बनावट आयडी वापरून दिविजला दहशतवादी कृत्यामध्ये अडकवण्याचे प्लॅनिंग केले. रेनेने तिच्या तंत्रज्ञानाच्या माहितीचा गैरवापर करत डार्क वेब आणि व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा आधार घेत बनावट ओळख बनवली. फेक आयडीच्या माध्यमातून तिने दिल्ली, पंजाब, बिहार, गुजरात आणि अन्य राज्यांना टार्गेट केले. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिएमवर आयपीएल २०२५ चा अंतिम सामना होणार होता. या सामन्याआधी प्रशासनाला या स्टेडिअमला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली. 

इतकेच नाही तर ज्या अहमदाबादच्या विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अपघातात २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्या अपघातानंतर या घटनेला दहशतवादी कारवायाशी जोडण्याचा प्रयत्न रेनेने केला. ज्या इमारतीला हे विमान धडकले त्या बीजे मेडिकल कॉलेजला रेने हिने धमकीचा ईमेल पाठवला. हे विमान इमारतीला धडकवण्यामागे दहशतवादी षडयंत्र होते, ते दिविशने रचले आहे असं दाखवण्याचा तिचा डाव होता हे देखील रेने जोशिल्दाच्या तपासातून उघड झाले आहे.

कसा झाला पर्दाफाश?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी रेनेने प्रत्येक कृत्यातून तिला वाचवण्याचा, स्वत:ची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सायबर फॉरेन्सिक आणि तंत्रज्ञान एक्सपर्टकडून मदत घेत पोलिसांनी अखेर रेने जिशोल्दाला अटक केली. तिच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. केवळ दिविजला त्रास देणे, त्याला जेलला पाठवणे या हेतूने रेनेने हे संपूर्ण षडयंत्र रचले होते. मात्र तिच्या कृत्यातून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरली आणि सुरक्षा यंत्रणाही त्रस्त झाल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPlane Crashविमान दुर्घटना