शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अजमेरहून आणलेले पिस्तूल ३० हजारांत करणार होते विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:54 IST

पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मोबाइलची कॉल डिटेल काढण्यास सुरुवात केली असून, ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, याबाबत माहिती काढली जात आहे.

ठळक मुद्देनिवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना, अमरावती शहरातील चित्रा चौकातून पोलिसांनी पिस्तूलसह जिवंत काडतूस व चाकू जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी पवन राजाभाऊ देशमुख (२१ रा. शिक्षक कॉलनी, चांदूर बाजार) व मोहम्मद इमरान मोहम्मद मोहम्मद जमील (३०, रा. नूरनगर, अमरावती) या दोन आरोपींना अटक केली आहे. 

अमरावती - राजस्थान येथील अजमेरहून आणलेले पिस्तूल अमरावतीत ३० हजारांत विक्री करण्याचा बेत आरोपींचा होता अशी माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना, अमरावती शहरातील चित्रा चौकातून पोलिसांनी पिस्तूलसह जिवंत काडतूस व चाकू जप्त केला. पिस्तूलसारखे शस्त्र अमरावतीत सापडल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. याप्रकरणात पोलिसांनी पवन राजाभाऊ देशमुख (२१ रा. शिक्षक कॉलनी, चांदूर बाजार) व मोहम्मद इमरान मोहम्मद मोहम्मद जमील (३०, रा. नूरनगर, अमरावती) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हे पिस्तूल व काडतूस अजमेरहून दहा हजारांत विकत घेतले. त्याचे डीलिंग अमरावतीमधील एका व्यक्तीसोबत करण्यात आले. चित्रा चौकात पिस्टलचे डीलिंग होणार होते. त्यापूर्वी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मोबाइलची कॉल डिटेल काढण्यास सुरुवात केली असून, ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, याबाबत माहिती काढली जात आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.  

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती