शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीसाठी आणलेले पिस्तूल, काडतुसे जप्त : सांगवी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 16:53 IST

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनी अटक

पिंपरी : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनीअटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. विशालनगर येथे सोमवारी (दि. २९) सकाळी सव्वासातच्या सुमारास सांगवीपोलिसांनी ही कारवाई केली.विक्या घिसाडी उर्फ विकास बबन पवार (वय ४८, रा. शिवशक्ती तरुण मंडळ, रेल्वे लाईन जवळ, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कैलास पर्वतराव केंगले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार हा विशालनगर येथील चोंधे लॉन्स, नदीच्या पुलाजवळ पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. त्यावेळी आरोपी कापडी पिशवी घेऊन संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत काय आहे, असे विचारले असता त्याने पिशवी लपवून त्यात काहीही नसल्याचे पोलिसांना सांगितले. तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्याची पिशवी तपासली असता त्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. आरोपी विक्या याने तो गावठी कट्टा विक्रीसाठी आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ ऊंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी रोहीदास बोऱ्हाडे, कैलास केंगले, सोमनाथ असवले, विनायक देवकर, शशिकांत देवकांत, अरुण नरळे, नितीन खोपकर, अनिल देवकर, दिपक पिसे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangviसांगवीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक