शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 4:21 PM

दहशत माजविण्यासाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देदत्तवाडी पोलिसांची कारवाई : जनता वसाहतीमध्ये गुन्हेगार पसरवित होता दहशत

पुणे : दहशत माजविण्यासाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले. तेजस शंकर पडवळ (वय २४, रा. गल्ली क्रमांक ९१, जनता वसाहत) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या सुचनांनुसार सध्या सराईतांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस नाईक सोमेश्वर यादव व पोलीस शिपाई रोहन खैरे यांना खबऱ्यामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली. निळ्या रंगाची जीन्स आणि शर्ट घातलेल्या तरुणाकडे बेकायदा शस्त्र असून तो जनता वसाहतीमधील राममंदिराजवळ उभा असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक घेवारे यांच्या आदेशानुसार, उपनिरीक्षक अनिल डफळ, तानाजी निकम, रविंद्र फुलपगारे, सुधीर घोटकुले, सोमेश्वर यादव, महेश गाढवे, रोहन खैरे, सागर सुतकर, विकास कदम, शरद राऊत, शिवाजी क्षिरसागर, राहूल ओलेकर, अमित सुर्वे यांनी सापळा लावला. उपलब्ध वर्णनातील आरोपी पडवळ याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदा अग्निशस्त्र आणि काडतुसे मिळून आली. पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्र हवालदार करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक