शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

बनवेगिरीचा कळस; तुळजापुरात प्राचीन तीर्थकुंडच हडपला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 10:07 AM

Tuljapur: तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला एक अख्खा तीर्थकुंडच काहींनी हडप करून त्यावर खासगी बांधकाम सुरू केले होते. याची माहिती कळताच चौकशी लावण्यात आली होती.

उस्मानाबाद : तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला एक अख्खा तीर्थकुंडच काहींनी हडप करून त्यावर खासगी बांधकाम सुरू केले होते. याची माहिती कळताच चौकशी लावण्यात आली होती. त्यात बनवेगिरीने हा तीर्थकुंड खासगी व्यक्तीच्या नावे झाल्याचे निष्पन्न होताच सहभागी सर्वांवर फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.तुळजापुरात अनेक प्राचीन स्थळे  असून कालौघात ती नष्ट होत आहेत. मंकावती तीर्थकुंड हे त्यापैकीच एक. काही स्थानिक लोकांनी बनवेगिरी करीत ते आपल्या मालकीचे असल्याचे भासवून नावावर केले. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी चौकशी सुरू केली. तहसीलदार व पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी तपासणी केली असता तीर्थकुंडावर पालिकेची मालकी असल्याचे दिसून आले. तसा अहवाल त्यांनी सादर केला. यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच हा तीर्थकुंड लगेच मूळ आखीव पत्रिकेच्या आधारे शासन खाती नोंद घ्यावी व ते जमा करून घ्यावे. 

तर होणार गुन्हे दाखल जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ असलेली स्थळे आहेत, अशी स्थळे कोणी खासगी व्यक्तींनी हडपली असल्यास नागरिकांनी त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी, हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. यामुळे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद