शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

‘त्या’ मुलाची सुखरूप सुटका, खंडणी मागणारे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:47 IST

थेरगाव येथे राहणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाच्या पाच वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सुफियान नासिर खान असे बालकाचे नाव आहे.

पिंपरी - थेरगाव येथे राहणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाच्या पाच वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सुफियान नासिर खान असे बालकाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा अपहरणकर्त्यांना बुधवारी वाकड पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शकील सलीम खान (वय ३२, रा. मुबई), शारुख मिरज खान (वय २६, वाल्हेकरवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. चार आॅक्टोबरला दुचाकीवरून आलेल्या एकाने सुफियानला नेले. सुफियान बेपत्ता झाल्याची फिर्याद नासिर झाकीर खान यांनी पोलिसांकडे दिली. दुसºया दिवशी अपहरणकर्त्याने तुमहारा तडका हमारे कबजे मे है, अगर वो सही सलामत चाईए तो पाच लाख रुपये दो असे फोनवरून धमकावले. त्या वेळी खंडणीसाठी अपहरण झाले असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी तपास पथके तयार केली. एकाने मुलाला नेले तर दुसरा येथून त्याला मदत करीत होता. आरोपी मोहम्मद याने मुलाला शिक्रापूर, लोणावळा आणिवसई, विरार येथे नेले होते. पोलिसांनी दुसरा आरोपी शाहरुख यास ताब्यात घेतले होते़ त्याला बरोबर घेऊन पोलीस पथक दुसºया आरोपीच्या मागावर होते.खंडणीची रक्कम देण्याची तयारी दाखऊन आरोपीला बोलावण्यात आले. सात आॅक्टोबरला आरोपी मुलाला घेऊन चिंचवड येथे खंडणीची रक्कम नेण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडून मुलाची सुखरूप सुटका केली.खंडणीसाठी अपहरण करणारे दोन्ही आरोपी नात्याने साडू आहेत. त्यातील आरोपी शाहरुख खान याचे मुलाच्या आईच्या ब्युटी पार्लर शेजारी अंडी विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे आरोपी मुलाच्या आईवडिलांच्या ओळखीचे आहेत. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे माहीत असल्याने त्यांनी मुलाच्या अपहरणाचा प्लॅन रचला होता़ तो अपयशी ठरला. पोलिसानी त्यांना जेरबंद केले.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्तनम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, तसेच दत्तात्रय सणस, बिभीषण कण्हेरकर, रमेश गायकवाड, प्रमोद भांडवलकर, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी