शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

कबुतर जा..जा! तुरुंगात कबुतराच्या माध्यमातून पोहोचवले जात होते ड्रग्ज, पंखांमध्ये दडलं होतं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 22:50 IST

ड्रग्जने भरलेली छोटी पिशवी घेऊन जाणारे कबुतर कॅनडाच्या तुरुंगात पकडण्यात आले आहे.

ड्रग्जने भरलेली छोटी पिशवी घेऊन जाणारे कबुतर कॅनडाच्या तुरुंगात पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या महिन्यात २९ डिसेंबर रोजी ब्रिटिश कोलंबियाच्या अॅबॉट्सफोर्ड जेलमध्ये घडली होती. धक्कादायक म्हणजे कबुतराला एका लहान पिशवीसह पकडण्यात आले, ज्यामध्ये क्रिस्टल मेथ सापडले आहे.

ग्लोबल न्यूजशी बोलताना कॅनेडियन सुधारक संघाचे पॅसिफिक क्षेत्राचे अध्यक्ष जॉन रँडल म्हणाले, "पॅसिफिक इन्स्टिट्यूशनमध्ये एक कबूतर भिंतींच्या आत लपलं होतं आणि त्याच्याकडे एक लहान पॅकेज असल्याचे दिसलं, जे बॅकपॅक असल्याचं दिसलं. पक्षी घेऊन जात असलेल्या बॅकपॅकमध्ये क्रिस्टल मेथ ड्रग्ज लपवलेलं होतं"

कबुतराच्या पाठीवर होते एक छोटेसे पॅकेटकबुतर जिथे बसलं होतं तिथं कैद्यांचं युनिट होतं. दररोज कैदी या अंगणात फिरण्यसाठी खेळ खेळण्यासाठी किंवा ताजी हवा घेण्यासाठी येतात. यादरम्यान, अधिकाऱ्यांना एक तपकिरी पक्षी दिसला, ज्याच्या पाठीवर एक लहान पॅकेट होतं. अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर कबुतरला पकडण्यात आलं. अथक प्रयत्नांनंतर कबुतरावर बांधण्यात आलेलं पाकीट काढण्यात आलं आणि कबुतराला मुक्त करण्यात आलं. 

३० ग्रॅम क्रिस्टल मेथ ड्रग सापडलंअधिकारी जॉन रँडलच्या म्हणण्यानुसार, कबुतराच्या पाठीतून मिळवलेल्या मिनी-बॅकपॅकमध्ये अंदाजे ३० ग्रॅम क्रिस्टल मेथ होते, जे त्याला अत्यंत व्यसनाधीन मानले जाते. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पक्ष्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. ते म्हणाले की, तस्करी करताना कबुतरला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेथॅम्फेटामाइनला मेथ म्हणतात. त्याच्या स्फटिकाला क्रिस्टल मेथ म्हणतात. हे आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेसाठी उत्तेजक म्हणून कार्य करते. हे मध्यभागी आणि मणक्यामधील त्या महत्त्वपूर्ण भागाची क्रियाशीलता वाढवतं.

टॅग्स :Canadaकॅनडा