शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

५ महिने एकत्र राहून ठेवले शारीरिक संबंध; प्रेयसी गरोदर राहताच प्रियकराने काढला पळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 21:02 IST

Posco case : मारेगावात गुन्हा दाखल : आरोपीच्या शोधात पोलीस पथक झाले रवाना

ठळक मुद्देसंतोष दत्तू चौघुले (२७) असे आरोपीचे नाव असून तो मारेगाव येथील रहिवासी आहे.

मारेगाव (यवतमाळ) : शहरातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बाहेरगावी पळवून नेले. पाच महिने एकत्र राहिले आणि अल्पवयीन मुलगी गरोदर राहताच, प्रियकराने पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून प्रियकराविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियकराच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे.

संतोष दत्तू चौघुले (२७) असे आरोपीचे नाव असून तो मारेगाव येथील रहिवासी आहे. त्याने शहरातीलच एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवित डिसेंबर महिन्यात पळवून नेले होते. त्यावेळेस पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३६३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला. परंतु आरोपी व मुलीचा शोध लागला नाही. दरम्यान, हे जोडपे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात मोलमजुरी करून पाच महिने एकत्र राहिले, परंतु पाच महिन्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागल्याने अल्पवयीन पीडित मुलगी आईकडे मारेगावला परत आली. पीडितेने प्रियकराच्या विरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणी आरोपी संतोष दत्तू  चौघुले याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रियकर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाYavatmalयवतमाळPoliceपोलिसPregnancyप्रेग्नंसी