शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घ्या अन् विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्या; उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 18:48 IST

डीएसके प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवुणकदारांमार्फत याचिका..

ठळक मुद्देचांगल्या परताव्याच्या आमिषाने डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक

पिंपरी : गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी डीएसके प्रकरण तातडीने निकाली काढावे तसेच डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्यावे , अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. डीएसके प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवणूकदारातर्फे अ‍ॅड. चंद्रकांत बीडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.      चांगल्या परताव्याच्या आमिषाने डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी डीएसके यांना त्याच्या कुटुंबियासह अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या अनेक  महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. हे प्रकरण निकाली निघावे अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून केली जात आहे. अ‍ॅड. बीडकर यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यातील न्यायालयात खटला लवकर निकाली निघावा याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आत बीडकर यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात केली आहे. या प्रकरणात गुंतवणूकदारांचे १ हजार १५३ कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे तसेच हे प्रकरण तातडीने निकाली काढावे, डीएसके यांच्या ड्रीम सिटी प्रोजेक्ट म्हाडाला देऊन येणा-या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. सरकारने जप्त केलेल्या डीएसके यांच्या मालमत्तेचा ताबा अद्याप मिळालेला नसल्याने त्याचा लिलाव करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करावा. असेही याचिकेत नमुद करण्यात आल्याचे बीडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीCourtन्यायालयadvocateवकिलPoliceपोलिस