शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारत- न्यूझीलंड क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टा घेणाऱ्या एकाला लोणावळ्यात अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:19 IST

भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

पुणे : भारत-न्यूझीलंड दरम्यान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या मुंबईतील एकाला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पकडले. या कारवाईत मोबाइल संच, सट्टा घेण्यासाठी वही असा माल जप्त करण्यात आला. भाविन सामजी आनम (वय ३८, रा़ मुलुंड, मुंबई) असे त्याचे नाव आहे़ त्याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत मुंबईतील आणखी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे़ भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी तातडीने कारवाई करण्याची सूचना केली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक लोणावळ्यात रवाना झाले. पोलिसांनी हॉटेलमधील खोलीत छापा टाकला. तेव्हा भाविन सामजी आनम (वय ३८,रा. मुळेबाई चाळ, मुलुंड, मुंबई) एक दिवसीय क्रिकेट  सामन्यावर सट्टा घेत होता. त्याच्याकडून मोबाइल संच आणि वही जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने सट्टा खेळणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांकडून दया भानूशाली, चेतन झाला (वय ४६,रा. खारघर, नवी मुंबई), नीरव रमानी , माँटू जैन, शशी आजवानी (तिघे रा. मुलुंड, मुंबई), सुनिल जैस्वाल (रा. मिरा रोड, ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून चौघांना  अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक जीवन राजगुरु, महेश मुंडे, विजय पाटील, सुनिल बांदल, दिलीप जाधवर आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी