शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

३ बायका फजिती ऐका! मुलानं 'पप्पा' म्हणून हाक मारताच पठ्ठ्याचं सगळं बिंग फुटलं, त्यानंतर जे घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 09:30 IST

पटनाच्या पोठही गावात राहणाऱ्या संजय कुमार पासवानचा भांडाफोड झाला आहे. या पठ्ठ्याला लग्नाची इतकी हौस की त्याने आतापर्यंत ३ लग्न केली आहेत.

ठळक मुद्दे आरोपी युवकाचं पहिलं लग्न काशीनगरच्या धनरूआ येथील बेबी देवीसोबत झालं. त्याला पहिल्या पत्नीपासून ३ मुलं आहेतदुसरं लग्न ममता नावाच्या एका महिलेसोबत झालं. तिला एक मुलगा आहेतिसरी बायको पुष्पा कुमारी हिला नवऱ्याच्या काही हालचालींवर संशय निर्माण झाला आणि तिने त्याचा पाठलाग केला

पटना -  या जगात अनेक प्रकारचे शौकीन लोक राहतात. कोणाला फॅशनची आवड असते तर कोणाला कारची. प्रत्येकाला काही ना काही आवडत असतं. परंतु तुम्ही कधी ऐकलंय का? कोणत्या व्यक्तीला वारंवार लग्न करण्याचा छंद आहे. कदाचित नसेल परंतु पटनामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. ज्याठिकाणी त्या व्यक्तीने खोटं बोलून आणि फसवणूक करून अनेकांसोबत संबंध बनवले आहेत.

पटनाच्या पोठही गावात राहणाऱ्या संजय कुमार पासवानचा भांडाफोड झाला आहे. या पठ्ठ्याला लग्नाची इतकी हौस की त्याने आतापर्यंत ३ लग्न केली आहेत. आरोपी युवकाचं पहिलं लग्न काशीनगरच्या धनरूआ येथील बेबी देवीसोबत झालं. त्याला पहिल्या पत्नीपासून ३ मुलं आहेत. दुसरं लग्न ममता नावाच्या एका महिलेसोबत झालं. तिला एक मुलगा आहे. तर तिसरं लग्न पुष्पा कुमारी नावाच्या महिलेसोबत केले. हे तिन्ही लग्न खोटं बोलून आणि फसवणूक करून झालं. या तिन्ही पत्नींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेऊन तो संसार करत होता याची कोणालाही भनक लागली नाही.

परंतु तिसरी बायको पुष्पा कुमारी हिला नवऱ्याच्या काही हालचालींवर संशय निर्माण झाला आणि तिने त्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पुष्पाने नवऱ्याचा पाठलाग केला आणि नवऱ्याचे बिंग फुटलं. पुष्पानं नवऱ्याला त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत रंगेहाथ पकडलं. प्रकरण वाढल्यानंतर पुष्पा कुमारीनं नवऱ्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता आरोपीनं ३ लग्न केल्याचं धक्कादायक खुलासा समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपी दुसरी बायको ममता देवीजवळ पोहचला तेव्हा तिसरी पत्नी पुष्पा कुमारी तिच्या मुलांसह त्याठिकाणी पोहचली. ममताचा मुलगा जेव्हा आरोपी संजयला पप्पा बोलला तेव्हा पुष्पाकुमारीला मोठा धक्काच बसला. सध्या पोलिसांनी आरोपी संजयला अटक केली आहे. न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्यांनी आरोपीला जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी आरोपीवर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.   

टॅग्स :Policeपोलिस