शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! रेल्वे प्लॅटफॉर्मवर बोगस टीसींचा सुळसुळाट; ५ जणांना पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:13 IST

प्रवाशांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद आढळल्यास स्टेशनवरील रेल्वे अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमधून प्रवास करण्यावर निर्बंध आले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. परंतु याच संधीचा फायदा घेत मुंबईत काही टोळक्यांनी बनावट तिकीट तपासनीस बनून प्रवाशांना लुटण्याचे धंदे सुरू केले आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल आणि जीआरपी च्या मदतीने गेल्या ८ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट २०२१ दरम्यान उपनगरीय स्थानकांवर/गाड्यांमधून ५ बनावट तिकीट तपासनीस पकडले आहे.

अलीकडे, १३ ऑगस्ट रोजी दादर येथील हेड टीसी सुखवीर जाटव यांनी एका व्यक्तीला प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर प्रवाशांकडून तिकीट तपासताना पाहिले, त्यांना संशय आला आणि त्यांनी त्याला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस त्याला पकडण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले.

दुसऱ्या घटनेत ४ मे रोजी रोजी 02538 डाउन विशेष कुशीनगर एक्सप्रेसच्या डी1 डब्यातील प्रवाशांना एक व्यक्ती पावती देत ​​होता व पैसे स्वीकारत होता. सीनियर टीटीई अनंत कुमार यांनी चौकशी केली असता त्यांना आढळले की, तो बनावट टीसी आहे आणि त्याच्याकडे बनावट ईएफआर होता. त्यालाही जीआरपीकडे सोपवण्यात आले. तसेच  २८ एप्रिल रोजी कल्याण स्थानकावरील टीटीई हरिमंगल यादव यांनी कल्याण स्टेशनवरील 01071 विशेष कामायनी एक्सप्रेस मध्ये डी1 डब्यातील बनावट टीसी शोधला.

१५ मार्चला कुर्ला येथील हेड टीसी सिकंदरजीत सिंग आणि सायन स्थानकावरील हेड टीसी सुश्री वाघचौरे यांनी शीव स्टेशनवर बनावट टीसी शोधला. त्याच दिवशी, सँडहर्स्ट रोड स्थानकावरील सीनियर टीसी राजू गुजर यांनीही  बनावट टीसी पकडला. वरील सर्व बनावट टीसी पुढील कारवाईसाठी जीआरपी कडे देण्यात आले. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली एफआयआरही दाखल करण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस