शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरास प्रवाशांनी दिला चोप, डोंबिवली-बदलापूरदरम्यान घटना    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 01:51 IST

Crime news : या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा लोकलमध्ये घुसला कसा, हा प्रश्न केला जात आहे. विनोदला मंगळवारी कल्याण रेल्वे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे सांगण्यात आले.

डोंबिवली - सामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा नाही. मात्र, एका चोराने लोकलमधून प्रवास करीत मोबाइलचोरल्याची घटना डोंबिवली-बदलापूरदरम्यान सोमवारी मध्यरात्री घडली. प्रवाशांनी चोप देत त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.विनोद जाधव (१९) असे त्याचे नाव आहे. आधार कार्ड अथवा अन्य कागदपत्रे नसतानाही विनाेदने सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास केला. मध्यरात्री १ वाजता लोकल बदलापूरला पोहोचणार होती. तेव्हा एका कोपऱ्यात बसलेल्या विनोद याने विकास चौधरी या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून घेतला. तेव्हा झोपेत असलेले विकास एकदम जागे झाले. सावध होऊन त्यांनी विनोदला पकडले. तेवढ्यात अन्य प्रवाशांनी विनोदला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणाचा कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अरशद शेख हे तपास करीत आहेत. सध्या कल्याण जीआरपीने विनोदला अटक केली आहे. विनोदकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्याने याआधी चोरी केली आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा लोकलमध्ये घुसला कसा, हा प्रश्न केला जात आहे. विनोदला मंगळवारी कल्याण रेल्वे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे सांगण्यात आले. वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये नाराजीसध्या फार कमी प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा आहे. काही दिवसांपूर्वी महिलांसाठी लोकल सुरू झाली. मात्र, आपल्याला लोकल प्रवासाची मुभा कधी मिळणार, या प्रतीक्षेत सर्वसामान्य प्रवासी आहेत. प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ आणि जीआरपी प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना सोडत आहेत. काही दिवसांपूर्वी बोगस ओळखपत्रासह काही प्रवाशांना पकडले होते, तरीही अशा घटना घडतच असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलThiefचोरMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे