शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या; सोशल मीडियात उलट-सुलट चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 21:50 IST

Crime News : वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बीड जिल्ह्यातील परळी येथील एका २२ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारून पुण्यात आत्महत्या केली. पूजा लहू चव्हाण (वय २२, रा. हेवन पार्क,महंमदवाडी, मूळगाव. परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे.

ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली. दरम्यान, तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकेले नाही. परंतु संबंधित तरुणीच्या आत्महत्येवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्याबाबत अधिकृत कोणतीही तक्रार अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले की, पूजा महमंदवाडी येथील ‘हेवन पार्क’मधील इमारतीत ३० जानेवारी रोजी मूळ गावाहून स्पोकन इंग्लिशचे क्लासेस करण्यासाठी पुण्यात आली होती, सध्या ती चुलत भाऊ विलास गणेश चव्हाण व एक मित्र अरुण राठोड (रा. बीड) यांच्यासोबत राहत होती, तिचे आईवडील हे गावाकडेच राहतात, रविवारी रात्री पूजा व तिचे दोन मित्रासोबत पार्टी केली.

दरम्यान, सोमवारी दीड वाजताच्या सुमारास तिने अचानक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने चुलत भाऊ व मित्राने तिला रुबी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले, वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सर्व दृष्टिकोनातूनतपास सुरू केला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयाता पाठविला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह तरुणीच्या घरच्यांच्या ताब्यात दिला असून त्यांनी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावी नेले आहे. (Parli girl commits suicide in Pune.)

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, पूजा पदवीधर असून पुढे कोर्स करण्यासाठी ती चुलत भावाबरोबर पुण्यात आली होती. याबाबत अनेक बाबी चर्चेला जात असल्या, तरी त्याबाबत अद्याप कोणीही तक्रारदार समोर आला नाही. वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याBeedबीडPooja Chavanपूजा चव्हाण