शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांना कचऱ्यात टाकणारे माता-पिता जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:49 IST

पाषाण तलावाच्या जवळील कच-यात टाकून दिलेल्या जुळ्या भावंडांच्या पाषाणहदयी माता-पित्यांचा शोध चतु:श्रृंगी पोलिसांनी लावला

पुणे : पाषाण तलावाच्या जवळील कच-यात टाकून दिलेल्या जुळ्या भावंडांच्या पाषाणहदयी माता-पित्यांचा शोध चतु:श्रृंगी पोलिसांनी लावला असून, त्यांना अटक केली आहे. प्रेमसंबंधामधून या मुलांचा जन्म झाल्याची बाब समोर आली आहे.चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ जानेवारीला पाषाण तलावाजवळ रस्त्यावरील कचºयात दोन जिवंत जुळी नवजात बालके सापडली होती. त्यात एक स्त्री जातीचे व एक पुरुष जातीचे बालक होते. त्या दोघांना सांभाळण्यास असमर्थता दाखवून कचºयात फेकून दिल्याचे समोर आले आहे. परिसरातील नागरिकांमुळे आणि तेथील श्वानांमुळे ही दोन्ही चिमुकली सुखरूप होती. त्यांच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.चतुशृंगी पोलीस तपास पथकाने घटनेचा तपास केल्यानंतर शहरातील रूग्णालयांना भेटी देऊन माहिती घेतली. या तपासात जननी नर्सिंग होम, कर्वेनगर येथे १३ जानेवारी रोजी एका पुरूषाने महिलेला बाळंतपणासाठी दाखल केले होते. या महिलेला पहाटे ४.१० वाजता एक मुलगा व एक मुलगी झाली. त्यानंतर १४ रोजी हॉस्पिटलमध्ये कोणालाही काहीही न सांगता दोन्ही बाळांना घेऊन ते निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी पाषाण येथील कचºयात त्यांना टाकून दिले होते.तांत्रिक विश्लेषणावरून संबंधित महिला व तिचा प्रियकर यांना वडगाव येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.महिलेला आधीच्या पतीपासून तीन मुलीमहिला एकटी राहत होती. तिच्या पतीचे निधन झालेले असून, त्यापासून तिला तीन मुली आहेत. त्या मुलींना हॉस्टेलवर ठेवलेले आहे. तिचे ३० वर्षीय तरूणाशी प्रेमसंबंध जुळले आणि त्यातून दोन जुळी मुले झाली. दोन्ही बाळांना सांभाळणे कठीण जाईल, म्हणून दोघांनी त्यांना कचºयात टाकले. महिला घरकाम करते आणि तरूण पेटिंगचे काम करतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे