शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीलाच विकायला निघाले आई-बाप!; पोलिसांनी हाणून पाडला डाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 06:37 IST

सहा जणांना केली अटक

तीन मुलांच्या पाठोपाठ चौथी मुलगी झाल्याने तिला दीड लाखांमध्ये विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील दाम्पत्यासह दलाल आणि दोन नातेवाइकांचा ‘डाव’ ठाणे शहर पोलीस दलाच्या ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी उधळून लावला. यावेळी सहा जणांना अटक करून ‘त्या’ ३ ते ४ दिवसांच्या मुलीला सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट येथे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.      भिवंडीतील वकील अन्सारी व मुमताज अन्सारी हे त्यांची ३ ते ४ दिवसांपूर्वी जन्मलेली मुलगी दीड ते दोन लाख रुपये किमतीस विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत, अशी बातमी ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी बनावट खरेदीदार बनून नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. त्या नवजात बालिकेचे आईवडील व मध्यस्थी महिला यांनी नवजात बालिकेचा दीड लाखात सौदा ठरविल्यावर त्यांना ठाण्यातील कॅसल मिलनाका येथील स्वागत हॉटेल, येथे नवजात बालिकेस घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी त्या हॉटेलमध्ये सापळा रचून ठरल्याप्रमाणे नवजात बालिकेचे विक्रीकरिता आलेल्या व्यक्तींनी बनावट खरेदीदार बनून गेलेल्या पोलिसांकडून दीड लाखांची रक्कम स्वीकारून त्यांच्याकडील नवजात बालिकेला सुपूर्द करताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा डाव हाणून पाडला. भिवंडी शांतीनगरमधील रिक्षाचालक वकील शकील अन्सारी (३७) त्याची पत्नी मुमताज या दाम्पत्यासह मुमताज हिचे बहीण-भाऊ कायनात रिझवान खान (३०) आणि मुझम्मिल रिझवान खान (१८,रा. मुंब्रा) तसेच दलाल झिनत रशिद खान (२२) व वसीम इसाक शेख (३६, रा. मुंब्रा) अशा सहा जणांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० सह द जुवेनाईल जस्टीस केअर ॲन्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स ॲक्ट २०१५ चे कलम ८०,८१ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना राबोडी पोलिसांच्या हवाली केले.         संगोपनासाठी ठेवले ‘जननी आशिष’मध्येविक्री करण्यासाठी आणलेल्या नवजात बालिकेचा जन्म हा ४ डिसेंबर २०२१ रोजी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय येथे झालेला असून, तिला घटनास्थळी ताब्यात घेतल्यावर पुढील सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट येथे ठेवले आहे, अशी माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली.त्या दाम्पत्याला पहिले तीन मुले आहेत. त्यातच त्यांना चौथी मुलगी झाली. म्हणून त्यांनी त्या मुलीचा सौदा केला. त्या दाम्पत्यासह सहा जणांना पकडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १, ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस