शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

परमबीर सिंग प्रकरणाला वेगळं वळण! दाऊदचा हस्तक छोटा शकीलच्या ऑडिओचा पोलिसांकडून तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:15 IST

Parambir Singh Extortion Case : सिंग यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (b), १६६, १६७, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओत छोटा शकील याने संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी दिल्याचं ऐकू येतं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुली टार्गेटच्या आरोपामुळे देशमुखामागे ईडीचा ससेमिरा लागला असला तरी हे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चांगलेच अडकले आहेत. मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ५ पोलीस अधिकाऱ्यांवर सुरु असलेल्या खंडणी  प्रकरणात आता दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे या प्रकरणात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार त्याला एका खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात आला. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धमकावून वसुली करण्यात आली, असा आरोप श्यामसुंदर अग्रवालनं केला आहे. 

ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. यात सिंग यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (b), १६६, १६७, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात जैन आणि पुनामिया यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात मोक्का देखील लावण्यात आला आहे. जैन आणि पुनामिया यांच्याकडून २६० जीबी डेटा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यातून खूप मोठे धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे. 

 

या प्रकरणात काही फोन रेकॉर्डिंग समोर आले आहेत. ज्यात एक व्यक्ती बिल्डर संजय पुनमिया याला फोन करून धमकी देत असल्याचे ऐकू येत आहे. या ऑडिओत तुला दिलीपभाई सोबत प्रकरण मिटव सांगितले तर तू श्यामभाईला आता टाकलंस असं धमकावून त्याला मारण्याची धमकी दिली. गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, हे कॉल रेकॉर्डिंग अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय छोटा शकीलचे आहे. क्राईम डेटानुसार संजय पुनामियाला धमकावणारा समोरील इसम हा छोटा शकीलचा असल्याची माहिती मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप २०१६ सालची आहे. श्यामसुंदर अगरवाल यांच्या विरोधात देखील वेगेवेगळ्या पोलीस ठाण्यात १९ गुन्हे दाखल आहेत. 

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओत छोटा शकील याने संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी दिल्याचं ऐकू येतं आहे. ज्या संपर्क क्रमांकाहून हा फोन आला होता तो नंबर मुंबई पोलिसांच्या क्राईम डेटानुसार छोटा शकीलचा आहे. त्यामुळे २०१६ सालच्या या ऑडिओ प्रकरणात  शामसुंदर अग्रवालविरोधात १७ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा नोंद करुन त्याला मोक्का लावला होता. मुंबई पोलिसांची SIT या ऑडिओची सत्यता पडताळणीचे काम करत आहे. 

कॉल रेकॉर्डिंग संभाषणाचा काही भाग  

कथित छोटा शकील - पाकिस्तान का तो तुम्हे पता हैं ना कि क्या किया! ये खाली पता हैं ना... ये तो तुझे पता हैं ना!

संजय पुनामिया - अरे मुझे क्या करना हैं, कौन हिंदुस्थान में, कौन पाकिस्तान में

कथित छोटा शकील - इधर बम बांधेगा, उधार जाएगा... उडा देगा तेरे को! संजय यार तू क्या कर हैं हरकते!  तेरे को बताया था कि, दिलीपभाई से बात करके सेटल करले.. मैं भाई के घर से बात कर रहा हूं! 

संजय पुनामिया - हां जी!

कथित छोटा शकील - पेहचाना तुने 

संजय पुनामिया - हां हां बोलिये 

कथित छोटा शकील - भाई जब तुझे बोला था, दिलीपभाई से बात करके सेटल करले, तो तुने जो हैं वो श्यामभाई को अंदर क्यो कराया ? 

कथित छोटा शकील - चार बार तेरे को फोन किया! उस दिन बोला मेरे पास डॉक्युमेंट  हैं! भैया जैसा आप बोलते हो मैं करता हू

कथित छोटा शकील - तेरे को बोला अच्छा एक काम कर तू शाम को फोन लगा 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगExtortionखंडणीMumbaiमुंबईPoliceपोलिसChhota Shakeelछोटा शकीलunderworldगुन्हेगारी जगतDawood Ibrahimदाऊद इब्राहिमMCOCA ACTमकोका कायदा