शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Param Bir Singh: "आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू"; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:37 IST

दिवसभर झाले मंथन अन अखेर गुन्हा दाखल, अकोला पोलिसांचा रोल संपला : आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू

ठळक मुद्देगुन्हा दाखल केल्यानंतर अकोला पोलिस अधीक्षकांनी त्या घडामोडीची माहिती संबंधित वरिष्ठांना पहाटेपर्यंत दिली.घाडगे यांच्या तक्रारीची प्रत तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.पोलीस महासंचालनालय आणि गृहमंत्रालयातील शीर्षस्थानी बुधवारी दिवसभर प्रदीर्घ मंथन केले.

नरेश डोंगरे

नागपूर :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह राज्य पोलिस दलातील अनेक पोलीस अधिकारी गुन्हेगारी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी दिवसभर राज्य पोलिस दलातील शिर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील शिरस्थानचे प्रदीर्घ मंथन झाले. त्यानंतर अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. या पार्श्वभूमीवर परमवीर सिंग तसेच अन्य ३२ अशा एकूण ३३ जणांविरुद्ध बुधवारी अकोल्यात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणातील फिर्यादी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज रोहिदास घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस दलातील अन्य वरिष्ठांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार पाठवली होती. या तक्रारीत घाडगे यांनी परमबीर सिंग आणि अन्य ३२ जणांनी गुन्हेगारी  षडयंत्र रचून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप केला होता.

यासोबतच त्यांनी विविध आरोपही केले होते. घाडगे यांच्या तक्रारीची प्रत तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. सोबतच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर, पोलीस महासंचालनालय आणि गृहमंत्रालयातील शीर्षस्थानी बुधवारी दिवसभर प्रदीर्घ मंथन केले. घाडगे यांची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तसेच प्रकरण ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असल्यामुळे अकोल्यात झिरो क्राइमी (गुन्हा दाखल) करून तो तपासासाठी ठाणे आयुक्तांकडे वर्ग करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तशा संबंधीचे आदेश अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देण्यात आले. गुन्हा दाखल करून तो वर्ग करण्यापर्यंत गोपनीयता बाळगण्याचेही आदेश देण्यात आले.

त्यानंतर अकोला पोलिस दलातील धावपळ वाढली आणि बुधवारी रात्री १० वाजून ६ मिनिटांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, डॉ. संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर, कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डी. कांबळे. बाजारपेठ पोलिस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे, सहायक निरीक्षक ए. पी. अंबुरे,  मरगळे, पवार पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलिस नायक बापू तायडे, नायक मोरे, पोलीस निरीक्षक बापू गंगाधर रोहम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन महादेव राऊत, तत्कालीन विधी अधिकारी एन. के. सोनवणे तसेच इतर १० अशा एकूण ३३ जणांविरुद्ध गुन्हेगारी षडयंत्र रचणे आणि ॲट्रॉसिटी आशा एकूण २७ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.पहाटेपर्यंत वरिष्ठांना रिपोर्टिंगगुन्हा दाखल केल्यानंतर अकोला पोलिस अधीक्षकांनी त्या घडामोडीची माहिती संबंधित वरिष्ठांना पहाटेपर्यंत दिली. रात्री एक वाजून ४५ मिनिटांपर्यंत लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन सारखा एंगेज होता.आमचा रोल संपला या संबंधाने आज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, 'या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आता आमचा रोल संपला.' अशी छोटेखानी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :PoliceपोलिसParam Bir Singhपरम बीर सिंग