शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

Param Bir Singh: २-३ दिवसांत परमबीर सिंगांवर तेलगी बॉम्ब? ६० हजार कोटींचा घोटाळा येणार चर्चेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 03:18 IST

त्यावेळेच्या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका, हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा हा बॉम्ब असून, संबंधित अधिकाऱ्याकडूनच तो परमबिर सिंगांवर टाकला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

नरेश डोंगरे नागपूर : वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंशी जवळीक भोवल्याने मुंबई सीपी पदावरून उचलबांगडी झालेले आणि नंतर गृहमंत्री अनिल देशमुखांवर लेटरबॉम्ब टाकल्याने सर्वत्र चर्चेला आलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर आता एक बॉम्ब पडण्याची शक्यता चर्चेला आली आहे.

हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा हा बॉम्ब असून, संबंधित अधिकाऱ्याकडूनच तो परमबिर सिंगांवर टाकला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकरण १९९९ चे आहे. ठाणे-मुंबई परिसरात एका टोळीकडून पोस्टाची बनावट तिकिटे विकली जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याला मिळाली होती. या दिलेर अधिकाऱ्याने त्यावेळी आपला जीव धोक्यात घालून तब्बल १५ दिवस वेशांतर करून या टोळीची पुराव्यासहित माहिती मिळविली. त्यानंतर २१ ऑगस्ट १९९९ ला या अधिकाऱ्याने मीरारोड पोलीस चौकीतील एक अधिकारी आणि सहकाऱ्यांसह छापा घालून फुलचंद जैन नामक आरोपीला पकडले. त्याच्याकडून २१ हजारांची बनावट पोस्टाची तिकिटे, महसूल तिकिटे (रेव्हेन्यू स्टॅम्प) आणि रोखे हस्तांतरणासाठी वापरली जाणारी तिकिटे जप्त केली. तेलगी घोटाळ्याचा तो पहिला एफआयआर मीरारोड पोलीस चौकीत (सीआर नंबर २७४/ १९९९) नोंदवला गेला होता. त्यानंतर पुढच्या चार दिवसात अनुक्रमे उमेश खंडेलवाल  आणि भाऊसाहेब जगदाळे (जीपीओ, व्हीटी, मुंबई)ला पकडले.

जगदाळे हा पोस्टाचा कर्मचारी होता अन् त्याच्याकडे तिकीट विक्रीचे काऊंटर होते. तो तेलगीनिर्मित अर्धी बनावट तिकिटे विकायचा अन् अर्धी तिकिटे पोस्टाची विकायचा. बनावट तिकिटांच्या विक्रीची रक्कम नंतर या रॅकेटमधील आरोपी वाटून घ्यायचे. जगदाळेने पुन्हा काही महत्त्वाची माहिती दिली. त्यावरून विजय कदम याला शिवडीत अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तिकिटांना पाडल्या जाणाऱ्या छिद्राची मशीन आणि मोठ्या प्रमाणात बनावट तिकिटे जप्त करण्यात आली. यानंतर उदय सावंत हा बडा मासा पकडून याच अधिकाऱ्यांनी २५ ऑगस्ट १९९९ ला कुलाब्यातील मिंट रोडवर असलेल्या अक्षर मुद्रणालय येथे छापा घातला. तेथे सुमारे ९८ लाखांची बनावट तिकिटे, मुद्रांक पोलिसांना सापडले. 

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सील लावण्याची गरज नाही, तुम्ही निघून या, असे म्हटले. अधिकाऱ्यांच्या मते, त्यावेळी ठाणे ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून परमबीर सिंग होते आणि त्यांच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी म्हणून पाटील ओळखले जात होते. पुढे या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आणि ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. हा सर्व खटाटोप तेलगी आणि साथीदारांना वाचविण्यासाठीच झाला होता अन् तो परमबीर सिंगांच्या इशाऱ्यावरूनच झाला होता, असाही या अधिकाऱ्याचा दावा आहे.

दोन-तीन दिवसांत फुटणार बॉम्बयाच अधिकाऱ्यांपैकी एकाने लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली असून परमबिर सिंगांमुळे देशाला ६० हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले, असा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. हा बॉम्ब दोन-तीन दिवसांतच फुटण्याची शक्यता त्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर वर्तविली आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंग