शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील ' तो ' शरीराचा थरकाप उडविणारा खून व्याजाच्या कारणावरुन; तीन जणांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:33 IST

४९ लाख रुपये व्याजाने दिले असताना त्यावर २ कोटी रुपये वसुल केल्यानंतरही सतत पैशाची मागणी धमकीमुळे खून

ठळक मुद्देकोंढवा पोलिसांनी आणला गुन्हा उघडकीस, तिघे जण ताब्यात

पुणे : कोंढवा येथील ब्रम्हा काँट्री बिल्डिंगमध्ये घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ याचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोंढवापोलिसांना यश आले असून पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. ४९ लाख रुपये व्याजाने दिले असताना त्यावर २ कोटी रुपये वसुल केल्यानंतरही आणखी सतत पैशाची मागणी केल्यामुळे व सततच्या धमकीमुळे वैतागलेल्या एकाने दोन साथीदाराच्या मदतीने पप्पू पडवळचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. लतिफ आबु शेख (वय ४३, रा. पारगेनगर, कोंढवा) असे प्रमुख संशयिताचे नाव आहे़. पप्पू पडवळ हा गेल्या काही वर्षापासून व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. त्याने कोंढव्यातील लतिफ शेख याला वेळोवेळी ४९ लाख रुपये दिले होते. लतिफ हा स्कॅप व फॅबिकेशनचे काम करतो. कर्जासाठी त्याने फ्लॅट व कागदपत्रे गहाण ठेवले होते. लतिफने त्याला आतापर्यंत २ कोटी रुपये दिले तरीही पप्पू पडवळ पैशाची मागणी करीत होता. आणखी ८० लाख रुपये १५ तारखेपर्यंत दिले नाही तर तुझा मर्डर करतो, अशी धमकी दिली होती. त्यामुळे लतिफ याने पप्पूच्या खुनाचा कट रचला.लतिफ यांची आई आजारी असताना त्याने एका मौलानाकडून तिच्यावर उपचार केले होते. त्यातून ती बरी झाली होती. ही गोष्ट त्याने पप्पूला सांगितली होती. पप्पू यालाही झोप न येणे व इतर आजार होते. त्याने लतिफला त्या मौलानाला घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे पप्पूच्या घरात शिरण्याची संधी लतिफला मिळाली.  

असा केला खुन९ जुलै रोजी लतिफ पप्पूच्या घरी गेला़ त्याने मौलाना येत असल्याचे सांगितले. काही वेळाने नेहरु शर्ट घातलेले दोघे जण आले. त्यांच्या गळ्यात बॅग होती. त्याने हे मौलाना आहेत, असे सांगितले. आलेल्या दोघांनी पप्पूला खाली बसविले. त्याच्यासमोर लिंबू कापून ठेवले व मंत्र म्हणण्याचा बहाणा करुन त्याला डोळे बंद करायला सांगितले. जसे पप्पूने डोळे बंद केले़ तसे मागे उभे असलेल्याने आपल्याकडील बॅगेतून कोयता काढून पप्पूवर वार करायला सुरुवात केली. त्याचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व जण घर बंद करुन निघून गेले.११ जुलै रोजी पप्पूचा खुन झाल्याचे उघडकीस आले. 

असा केला तपासखून करताना कोणीही पाहणारे नव्हते़ पप्पू हा कोणा कोणाला व्याजाने पैसे देतो, त्याची नोंद एका डायरीत करत असे़ पोलिसांनी ही डायरी तपासली़ तेव्हा तो तब्बल ३५ टक्के व्याजाने पैसे देत असल्याचे दिसून आले. त्यात शेकडो लोकांची नावे होती. गेल्या चार पाच दिवसात कोंढवा पोलिसांनी सर्व तांत्रिक विश्लेषण करुन त्यापैकी अनेकांकडून माहिती घेतली. त्यात त्याचा लतिफवर संशय बळावला. त्यांनी ९ जुलै रोजी लतिफ कोठे कोठे गेला होता. त्याची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा तो त्या ठिकाणी गेला नसल्याचे उघड झाले. पोलिसांना सर्व समजल्याचे लक्षात आल्यावर लतिफ याने गुन्हा कबुल केला.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी सतत पाच दिवस तपास करुन हा गुन्हा उघडकीस आणला. ़़़़़़़़़मैने हैवान को मार डाला...तपास करताना पोलिसांनी त्याला ९ जुलै रोजी कोणते कपडे घातले होते, ते घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा त्याने ते कपडे आणल्यानंतर जॅकेट धुतले असले तरी त्यावर एका ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. तसेच त्याने तेव्हा सुरक्षारक्षकाची चप्पल वापरली होती़. उंड्री येथे तो गेलाच नव्हता. हे सर्व उघड झाल्यावर तो पोलिसांसमोर रडू लागला व म्हणाला, मैने हैवान को मार डाला..

टॅग्स :KondhvaकोंढवाPoliceपोलिसArrestअटकMurderखून