शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! न्यायालय परिसरातच महिला वकिलावर चाकूहल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:05 IST

Laywer Stabbed : आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अप्पर पोलीस अधीक्षकांसह कर्मचारी दाखल

वर्धा : जीवे मारण्याच्या प्रयत्नात गुन्हा दाखल असलेल्या ८२ वर्षीय वृ़द्धाने न्यायालय परिसरात चक्क साक्षिदार असलेल्या महिला वकिलावरच चाकूहल्ला केला. ही घटना मंगळवारी २२ रोजी वर्धा न्यायालय परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने न्यायालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी कर्मचाऱ्यांसह न्यायालयात दाखल झाले. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.योगिता रमेश मुन (४३) रा. पुलगाव असे जखमी महिला वकिलाचे नाव असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपी भीम गोविंद पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी भीम गोविंद पाटील याने २०१६ मध्ये महिला वकिल योगिता मून यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची तारीख मंगळवारी वर्धा येथील सेशन न्यायालयात असल्याने आरोपी भीम पाटील आणि साक्षिदार महिला वकिल योगिता मुन हे दोघेही न्यायालय परिसरात हजर होते. दरम्यान भीम पाटील याने योगिता मुन यांच्या पाठीमागून चाकूने हल्ला चढविला. दरम्यान त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या. तत्काळ जखमी महिला वकिलाला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांनी दिली.................

आरोपी होता महिला वकिलाचा पक्षकारमहिला वकिल योगिता मुन यांनी आरोपी भीम गोविंद पाटील यांच्यातर्फे दोन दिवाणी दावे पुलगाव येथील न्यायालयात दाखल केले होते. आरोपी हा त्यांचा पक्षकार होता. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्याने भीम पाटील याने योगिता मुन यांना २०१६ मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याची तारीख वर्धा न्यायालयात मंगळवारी होती हे विशेष.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस