शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष, जव्हारमध्ये तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:54 IST

पोलिसांनी उधळला डाव; एक जण फरार

पाेलिसांनी आराेपींना जेरबंद करत त्यांच्याकडून बनावट नाेटा, त्रिशूल व जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

जव्हार : जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भामट्यांना जव्हार पोलिसांनी खंबाळा परिसरात बेड्या ठोकल्या. जादूटोण्याद्वारे पैसे दुप्पट-तिप्पट करून देण्याचे आमिष दाखविण्याचा हा प्रकार पोलिसांनी वेळीच उधळल्याने लाखोंची फसवणूक टळली आहे.

सिद्धी प्राप्त असल्याचे सांगून केतन कृष्ण पाटील (रा. वज्रेश्वरी), श्रीनाथ लक्ष्मण भोये (साखरे विक्रमगड), माणिक अर्जुन बात्रा (आलोंडे, विक्रमगड) व इतर एक अशा चारजणांनी वलसाड उपलपाडा येथील कमलेश मंगळीया जोगारी (३९) यांच्याकडून दीड लाख रुपये घेऊन जादूटोणा करून पाच लाख रुपये करून देतो, असे आमिष दिले.

जव्हार पोलिसांना याची माहिती लागली. त्यांनी १२ जानेवारीला रात्री २ वाजेच्या सुमारास खंबाळा परिसरात सापळा रचला. एक इनोव्हा कार व एक मोटारसायकल थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे बनावट नोटा, त्रिशूल व जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांना मिळाले. जादूटोणा करणार असल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी तिघांना जागेवरच बेड्या ठोकल्या; मात्र चौथा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला.

कमलेश जोगारी यांच्या फिर्यादीवरून जव्हार पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी संजीव पिंपळे यांच्या सूचनेप्रमाणे जव्हार पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे, उपनिरीक्षक जितेंद्र अहिरराव यांचे पथक तसेच जव्हार व मोखाडा पोलिसांनी ही कारवाई केली.

खोट्या नोटांची बंडले

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या तिघा ठगांकडून दोन हजार रुपयांच्या २७ खोट्या नोटांचे बंडल, पाचशे रुपयांच्या  ७५ खोट्या नोटांचे बंडल, नोटांच्या आकाराचे कोरे कागदी बंडल, काचेचे तुकडे, विविध प्रकारचे पूजेचे सामान, त्रिशूळ व दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघर