शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 11:21 IST

सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल.

प्रेमापोटी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरला आता येथेच राहायचं आहे. शनिवारी (8 जुलै 2023) तुरुंगातून सुटल्यानंतर तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिचा प्रियकर सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. ती म्हणाली की, जर ती पाकिस्तानात गेली तर ती जिवंत राहणार नाही. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तिचा भारतीय प्रियकर सचिन आणि सचिनच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती.

आज तक या टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. तिने तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरचा दावाही फेटाळला आणि तो तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नाही तर गुलाम तिच्या चेहऱ्यावर मिरच्या फेकण्यासारखे धक्कादायक कृत्य करून अत्याचार करत असल्यातं सीमाचं म्हणणं आहे. 

"भारतात राहण्याची परवानगी द्या"

सीमाने दावा केला की ती गेल्या चार वर्षांपासून गुलामसोबत राहत नाही आणि सचिनने तिची चारही मुले दत्तक घेतली आहेत, त्यामुळे आता तिला त्याच्यासोबत भारतात राहायचे आहे. 4 जुलै रोजी अटक केल्यानंतर सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी तिघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

गेमिंग एप PUBG ने झाली प्रेमाची सुरुवात सीमा आणि सचिन गेमिंग एप PUBG वर बोलू लागले आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. यानंतर दोघांनी लग्नासाठी वकिलाशी चर्चा केली असता सीमाकडे व्हिसा नसून ती बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. वकिलाच्या तक्रारीवरून सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना अटक करण्यात आली असून आता पाच दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही जामीन मिळाला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ