शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पाकिस्तानी गायक राहत अली खान यांना ईडीची नोटीस, परकीय चलन अवैधरीत्या देशाबाहेर पाठवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:02 IST

२ कोटी देशाबाहेर पाठविल्याचा ईडीचा ठपका

ठळक मुद्देपाकिस्तानी प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे.याप्रकरणी त्याच्याकडून योग्य खुलासा न केला गेल्यास त्याला अटक होण्याची शक्यता ईडी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई - पाकिस्तानी प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी त्याच्याकडून योग्य खुलासा न केला गेल्यास त्याला अटक होण्याची शक्यता ईडी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान याला फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहत फतेह अली खान गेल्या काही वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी करीत असल्याचे समोर आले आहे. राहत हे सुप्रसिद्ध दिवंगत पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांचे भाचे आहेत. २००९ साली लागी तुमसे मन की लगन या गाण्यासह त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने परकीय चलनाच्या माध्यमातून प्रचंड कमाई केली आहे. मात्र, त्याचा कोणताही हिशेब त्याने आयकर विभागाला दिलेला नाही. या चलनाची तो देशाबाहेर तस्करी करीत असल्याचेही आढळून आले आहे.ईडीने दिलेल्या माहितीनुसार, राहतने ३ लाख ४० हजार डॉलर कमावले होते. त्यातील २ कोटी बेकायदेशीररित्या भारताबाहेर पाठवले. इतके पैसे त्याने नेमके कसे कमावले आणि भारताबाहेर कुठे आणि का पाठवले, अशी विचारणा ईडीने त्याला केली आहे. राहतने या प्रश्नांची समाधानकारक उत्तर न दिल्यास त्याला तस्करी करण्यात आलेल्या रकमेच्या ३०० टक्के दंड भरावा लागणार असून दंड न भरल्यास त्याला अटक होऊ शकते, अशी माहिती ईडीतील सूत्रांनी दिली. २०११ मध्ये परकीय चलन घेऊन जाताना त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडविण्यात आले होते. त्यावेळी तो मांस निर्यातदार मोइन कुरेशी यांच्या दिल्लीतील घरी एका लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आला होता. याच मोईन कुरेशीकडून लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. राहतच्या मोईन कनेक्शनमुळे त्याच्यावरील संशय आणखी बळावला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे ईडी अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसPakistanपाकिस्तानdelhiदिल्ली