शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: रवी चौकशीसाठी मुंबईत, भेटीविनाच रवीच्या आईचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:40 IST

रवीने पाक एजंटांना गोपनीय माहिती फेसबुकवर दिली

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कळव्याच्या रवी वर्मा याच्या आईने शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ठाणे दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी रवीच्या आईने पोलिसांपुढे हात जोडले. मात्र, मुलाच्या भेटीसाठी आलेल्या आईला काही क्षणात भेटीविना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

वर्मा याने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याला मुंबईला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण, याबाबत संबंधित विभागाकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रथम रवीच्या संपर्कात आलेली पायल शर्मा हिच्याशी संवादानंतर मैत्री आणि त्यातून प्रेम झाल्याची माहिती चौकशीत रवी याने दिली. रवीने पाक एजंटांना गोपनीय माहिती फेसबुकवर दिली. प्रेमसंबंध आणि मिळणाऱ्या पैशामुळे माहिती दिल्याचेही जवळपास स्पष्ट झाले.

पाच महिलांची नावे चौकशीत उघड

सात महिन्यांच्या कालावधीच्या पाक एजंटच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या वर्माने पाच जेटीसह १४ पाणबुड्या, युद्धनौका, मोठी जहाज याच्यासोबतच सैन्य दलाच्या शस्त्रसाठ्याच्या ठिकाणाची माहिती, बॅकअप प्लॅन काय आहे. नौदलाच्या गोडाऊनमध्ये कुठल्या प्रकारचा शस्त्रसाठा आहे, त्याच्या संरक्षणासाठी तैनात केलेला फौजफाटा त्यासोबतच अन्य माहिती दिली. त्याच्या चौकशीत पायल शर्मा, इस्प्रित, आकृती, सिंगल कुमार, प्रीती कुमार या पाच महिलांची नावे उघड झाली आहेत.

चौकशीत सहकार्य नाही

रवी हा एटीएसला चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच त्याने मोबाइलमधून अनेक माहिती डिलिट केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याबाबत संबंधित विभागाकडून अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर