शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

३ दिवसांत दुसऱ्यांदा पाकिस्तान हादरला: कराचीत मशिदीजवळ आयईडी स्फोटात महिलेचा मृत्यू, ११जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:26 IST

Blast in Pakistan : स्फोटासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) वापरण्यात आल्याचे कराची पोलिसांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोमवारी पुन्हा एकदा कराचीत दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. येथील खारदर भागातील न्यू मेमन मशिदीजवळ झालेल्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत.स्फोटासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) वापरण्यात आल्याचे कराची पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात पोलीस पिकअप आणि इतर काही वाहनांचे नुकसान झाले. आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पंतप्रधान म्हणाले- कठोर कारवाई केली जाईलपंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांना तात्काळ पकडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. सिंध सरकारला मदत करण्याबाबतही ते बोलले आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी सर्व जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सिंधचे आयजीपी मुश्ताक अहमद महार यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

या भागात गुरुवारी स्फोट झालाकराची शहरात तीनमधील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. याआधी गुरुवारी कराचीच्या या भागात झालेल्या स्फोटात १ नागरिक ठार झाला होता, तर १३ जण जखमी झाले होते. ही घटना घडवून आणण्यासाठी दुचाकीमध्ये आयईडी बसवून त्याचा स्फोट करण्यात आला.१८ दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला होतापाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अवघ्या १८ दिवसांपूर्वी कराची विद्यापीठावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका कारजवळ हा हल्ला झाला. मृत्युमुखी पडलेल्या पाचपैकी तीन महिला प्राध्यापक चीनमधील आहेत. चौथा  पाकिस्तानी ड्रायव्हर आणि पाचवा गार्ड होता.

टॅग्स :Blastस्फोटMosqueमशिदPakistanपाकिस्तानPoliceपोलिसDeathमृत्यू