शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संशयातून आधी पत्नीला शेतात संपवले; घरी परतून सासरच्यांची केली पहारीने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:36 IST

मृतांमध्ये दोन मेव्हणे व सासऱ्याचा समावेश; सासू ओरडल्याने वाचली 

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब (जि. यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय व त्यातून झालेल्या वादातून जावयाने पत्नीसह सासरा आणि दोन मेव्हण्यांची  पहारीने हल्ला करून हत्या केली, या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली. तिरझडा (ता. कळंब) येथे मंगळवारी रात्री घडलेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. आरोपी गाेविंद पवारला (४०, रा. कळंब माथा, ह.मु. तिरझडा) न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठाेठावली आहे.

पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसले (५०), मेव्हणा ज्ञानेश्वर ऊर्फ नाना घोसले (३२), मेव्हणा सुनील घोसले (२८), अशी मृतांची नावे आहेत. सासू रुखमा पंडित घोसले (४७) ही गंभीर जखमी आहे.

एकेकावर पहारीचे प्रहार रात्री गोविंद पत्नीला घेऊन लहान मेव्हण्याचा डबा पोहोचविण्यासाठी शेतात गेला. तेथे त्याने पत्नी व मेव्हण्यावर पहारीने घाव घालून त्यांची हत्या केली. नंतर तो घरी परतला. त्यावेळी मोठा मेव्हणा, सासरे व सासू हे सर्व झोपलेले होते. गोविंदने मेव्हणा ज्ञानेश्वरवर पहारीने प्रहार करून त्याला संपविले. नंतर तो बाजूच्या घरात झोपलेल्या सासू व सासऱ्यांकडे गेला. त्यांच्यावरही त्याने हल्ला चढविला. जखमी सासूने आरडाओरडा केल्यामुळे ती वाचली. यात शेजारी जागे झाल्याने, गोविंद तीन मुलांना दुचाकीवर बसवून पसार झाला. आरोपी कळंब येथेच असल्याचे समजल्यानंतर रात्रीच त्याला अटक करण्यात आली.

तो का सुडाने पेटला?आरोपी तीन महिन्यांपासून पत्नीसह सासुरवाडीत राहत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करीत होता. यावरून झालेल्या वादातून सासऱ्याने व मेव्हण्यांनी जावयाला मारहाण केली होती. तेव्हापासून तो सुडाने पेटला होता. . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी