शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडले, पोलिसांनी वसुल केला हजारोंचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 22:57 IST

संचार बंदीचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

ठळक मुद्देगडचिरोली पोलीस दलाचा दणका वाहनांवर मोपकाअंतर्गत (मोटर परिवहन कायदा) कारवाई करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात काही बेजबाबदार नागरिक संचार बंदीचे उल्लंघन करत हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.

गडचिरोली - संचार बंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणार यांना गडचिरोली पोलीस दलाचा दणका वाहनांवर मोपकाअंतर्गत (मोटर परिवहन कायदा) कारवाई करण्यात आली असून 81 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संचार बंदीचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असताना गडचिरोली जिल्ह्यात काही बेजबाबदार नागरिक संचार बंदीचे उल्लंघन करत हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभरात कारवाईचा बडगा उचलला असून संचार बंदीच्या काळात जिल्ह्याभरात आजपर्यंत एकूण 322 वाहनांवर मोटर परिवहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 81 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात जनतेला जीवनावश्यक साहित्याची अडचण भासू नये यासाठी शासनाने जीवनावश्यक साहित्याची सेवा देणाऱ्या केंद्रांना सूट दिलेली आहे.  

परंतु काही बेजबाबदार नागरिक काहीएक कारण नसताना शहरात फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लावण्यात आलेल्या संचारबंदीचे सर्व नागरिकांनी पालन करणे आवश्यक असताना काही बेजबाबदार नागरिक केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी बाहेर पडणार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसGadchiroliगडचिरोलीcorona virusकोरोना वायरस बातम्या