शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन!; शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंना ‘सेक्सटॉर्शन’ कॉल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:22 IST

याप्रकरणी सुर्वेंकडून शुक्रवारी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार.

मुंबई : ‘हॅलो, हाऊ आर यू, क्या हुवा जी’ म्हणत मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना अनोळखी व्यक्तीने सेक्सटॉर्शन कॉल करत ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांचा मॉर्फ अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सुर्वे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांका  (८२८०५३५४४२) वरून ‘हॅलो, हाऊ आर यू’ असा मेसेज आला होता. त्यानंतर पुन्हा १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी तीन वाजता हाय, असा मेसेज आला होता. अनोळखी मोबाईल क्रमांक असल्याने त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर पुन्हा १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी सुर्वे यांचा व्हॉट्सॲप क्रमांक ९८२१०३४९२३ यावर आधीच्याच अनोळखी मोबाईल क्रमांकावरून ‘हॅलो, क्या हुआ जी’ असा मेसेज आणि मागोमाग व्हिडिओ काॅल आला. 

सुरुवातीला त्यांनी तो कॉल उचलला नाही. पण कॉलरने परत फोन केल्याने त्यांनी तो उचलला. तेव्हा समोर स्वतःचे कपडे काढून अश्लील चाळे करणारी महिला त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी कॉल कट केला, तरीही त्याच अनोळखी क्रमांकावरून पुन्हा व्हिडीओ कॉल येऊ लागले. तेव्हा ‘मला फोन करू नका, नाहीतर पोलिसात तक्रार करेन,’ असा मेसेज त्यांनी पाठवला. त्यावर सुर्वे यांचा चेहरा दुसऱ्या व्हिडीओचा माॅर्फ करून तयार केलेला व्हिडीओ त्यांना पाठवत ५ हजारांची मागणी कॉलरने केली. पैसे पाठविले नाहीत, तर व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकीही दिली. त्यानुसार सुर्वे यांनी दहीसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. धडा शिकविणे गरजेचेमला त्यांनी जसा त्रास दिला तसा अनेकांना दिला असून, त्यांना धडा शिकविणे गरजेचे असल्याने मी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.    प्रकाश सुर्वे, आमदार, मागाठाणे विधानसभा क्षेत्र

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPrakash surveप्रकाश सुर्वेPoliceपोलिस