शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा डी. मोहन पुन्हा निसटला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 00:07 IST

Crime News: राकेश पाटील हत्या प्रकरण : पनवेलला पोलीस वेळेवर पोहोचल्याने केली अटक

 लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : राकेश पाटील यांच्या हत्येनंतर फरार झालेला मुख्य आरोपी हा नागपूरहून मुंबईला परत येत होता. या प्रकरणात जास्त दिवस फरार राहणे शक्य नसल्यानेच तो मुंबईत पोलिसांच्या स्वाधीन होण्याच्या इराद्यानेच येत असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पनवेल स्थानकात उतरल्यावर डी. मोहन नेमका कोठे तावडीत सापडेल, याची जाणीव पोलिसांना नव्हती. मात्र, बस डेपोवर पोलीस वेळेवर पोहोचल्यामुळे तो जाळ्यात अडकला. पाच मिनिटे जरी विलंब झाला असता, तर डी. मोहन आणि त्याचे दोन्ही साथीदार पुन्हा फरार होण्याची शक्यता होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

२८ ऑक्टोबरला राकेश यांची हत्या झाल्यानंतर लागलीच डी. मोहन आणि त्याचे काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, काही आरोपींना मुरबाडजवळ ताब्यात घेण्यात आले. डी. मोहन आणि त्याच्या सोबतचे दोन प्रमुख आरोपी हे पोलिसांना गुंगारा देत महाराष्ट्रबाहेर फिरत होते. पुन्हा ते जळगावहून नागपूरला पळून गेले. शहरातील वातावरण तंग असल्याची कल्पना या फरार आरोपींना होती. आज ना उद्या आपण पोलिसांच्या तावडीत सापडणार हे माहिती होते. त्यामुळे ते आपल्या जवळच्या सहका-यांशी संपर्क ठेवून होते. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार हे तिघेही मुंबईत येऊन पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असावेत, म्हणून ते पुन्हा मुंबईत आल्याची शक्यता वर्तवली जात होती.

एन्काउंटरची त्याला होती भीतीपोलिसांना डी. मोहन ज्या ठिकाणी येईल, अशी माहिती मिळाली होती, त्या ठिकाणी तो वेळेत पोहोचलाच नाही. त्याने पनवेलला आल्यावर आपला मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याच्याच सहका-याने त्याचे एन्काउंटर होईल, अशी भीती मनात घातली असावी. या भीतीने आपला मार्ग बदलण्यासाठी पनवेल बस डेपोत गेला. त्या ठिकाणी बस पकडून तो पुन्हा फरार होण्याच्या मार्गावर होता. मात्र, पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरल्याने तो तावडीत सापडला.

टॅग्स :MNSमनसेMurderखूनPoliceपोलिस