शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

आत्मा पवित्र करण्यासाठी भोंदूबाबाने गायिकेला नग्न होण्यास सांगितले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 21:01 IST

भोंदूबाबाने नको ते कृत्य करण्यास सांगितल्याने गायिकेच्या सर्व प्रकार लक्षात आला.

ठळक मुद्देया प्रकरणी चारकोप पोलिसांनी उमेश रमाशंकर पांडे या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहे. व्यावसायिक प्रगतीच्याआड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याने आत्मा पवित्र करण्यासाठी नग्न होण्यास सांगितले.एका भोंदूबाबाने २१ वर्षीय गायिकेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात घडली.

मुंबई - घरात भरभराट, समृद्धी आणि व्यावसायिक वृद्धीच्या आड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याची भिती दाखवत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय गायिकेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात घडली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी उमेश रमाशंकर पांडे या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहे.पीडीत गायिका रिमिक्स अल्बमसाठी काम करते. ती चारकोपमध्ये संगीतकार पतीसह भाड्याच्या घरात राहते. उमेश रमाशंकर पांडे हा आरोपी देखील चारकोप परिसरामध्ये राहतो. घरात सुख, शांती समृद्धी आणि भरभराट यावी यासाठी दोघांनी घरात पूजापाठ करण्याचं ठरवले. दोघेही पूजेसाठी पुजारी शोधत होते. यावेळी त्यांची उमेश पांडेशी ओळख झाली. रविवारी पांडेला पूजेसाठी घरी बोलावले. पूजापाठ झाल्यानंतर भोंदूबाबा उमेश पांडेने तिच्या पतीला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर भोंदूबाबाने तिला व्यावसायिक प्रगतीच्याआड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याने आत्मा पवित्र करण्यासाठी नग्न होण्यास सांगितले. तसेच नंतर भोंदूबाबाने नको ते कृत्य करण्यास सांगितल्याने गायिकेच्या सर्व प्रकार लक्षात आला. तसेच पती घराबाहेर गेल्यानंतर महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन पांडेने तिच्यावरबलात्काराचा प्रयत्न केला. 

तिचा पती काही वेळाने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने पतीसह चारकोप पोलिसांकडे धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी उमेश पांडेला अटक केली. पीडित महिला आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई