शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास विरोध झाल्याने आत्येबहिणीस संपविले, होळीच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 09:35 IST

हा गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड : लग्नास नातेवाइकांनी विरोध केल्याने अल्पवयीन मुलीचा तिचा प्रियकर असलेल्या मामाच्या मुलाने खून केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना २७ मार्चपर्यंत तीन दिवस पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घोसापुरी येथील अल्पवयीन मुलीचे तिच्या मामाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते.   मुलीचे वय कमी होते. तसेच मुलाला  व्यसन असल्याने त्याच्यासोबत लग्न नको म्हणून नातेवाइकांचा विरोध होता. आपले लग्न होणार नाही या भावनेतून भगवान याने आत्याच्या मुलीचा दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी भगवान वैजनाथ गायकवाड, वैजनाथ माणिक गायकवाड, बाळू माणिक गायकवाड, रमेश गव्हाणे, अंकुश विश्वनाथ माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन आरोपींचा शोध सुरूखून करण्यात आलेली मुलगी अल्पवयीन आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटकेत आहेत. तिसरा भगवान याच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. मयत मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला नाही. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मयत मुलगी व भगवान यांचे प्रेमसंबंध होते. नातेवाइकांचा विरोध असल्याने ही घटना घडली. तपास सुरू आहे, असे पोनि बंटेवाड यांनी सांगितले.

दोघांना अटक, तीन दिवसांची कोठडीशनिवारी रात्री खुनाचा गुन्हा घडला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.या प्रकरणी पोलिसांनी भगवानचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड आणि अंकुश विश्वनाथ माळी यांना अटक केली असून दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिल्याचे पोनि शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले.

गुन्हा केल्यानंतर आरोपीने घेतले विषारी द्रवशनिवारी भगवान याने प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला फोन करून घरापासून जवळच असलेल्या ओढ्याजवळ बोलावून घेतले व तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. सदर मुलगी घरी उशिरापर्यंत न आल्याने तिच्या नातेवाइकांनी शोधाशोध केली. संशय आल्याने भगवान याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद येत होता. दरम्यान, आरोपी भगवान याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी