शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेल्या चितेतून मुलीचा मृतदेह बाहेर ओढला, अन्…; बलात्कार पीडितेच्या आईनं सांगितली थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 08:18 IST

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुजाऱ्यासह चौघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देकुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, कायद्याखाली दोषींवर कठोरात कठोर शिक्षा केली जाईल घटनेच्या वेळी माझी मुलगी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती मुलीच्या आईवडिलांसह अनेक लोकांनी मंगळवारी या प्रकरणी घटनास्थळी धरणं आंदोलन केले

नवी दिल्ली – राजधानीत ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. विरोधी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केले आहे. तर आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत तात्काळ या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.

पुजाऱ्याने सांगितले, करंट लागल्याने मृत्यू

 पीडिताच्या आईवडिलांनी आरोप केलाय की, माझ्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे आणि एका पुजाऱ्याने खोटं बोलून तिचे अंत्यसंस्कार केले आहे. मुलीचा करंट लागून मृत्यू झाल्याचं त्याने सांगितले. मुलीच्या आईवडिलांसह अनेक लोकांनी मंगळवारी या प्रकरणी घटनास्थळी धरणं आंदोलन केले. दोषींना मृत्यूदंड देण्याची मागणी केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी देखील आंदोलन केले आहे.

माझी मुलगी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती...  

मुलीच्या आईनं म्हटलंय की, घटनेच्या वेळी माझी मुलगी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती. पुजाऱ्याने मला काही क्षणांसाठी मुलीचा मृतदेह दाखवला. तिचे होठ निळे पडले होते. पुजाऱ्याने आमच्या मर्जीशिवाय मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मुलीला करंट लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पुजारी खोटं बोलत आहे. पुजाऱ्यानेच माझ्या मुलीवर बलात्कार केला असा आरोपही त्यांना लावला आहे.

...अन् पेटलेली चिता विझवली

आमच्या समाजाच्या काही माणसांनी पेटलेली चिता विझवली आणि माझ्या मुलीच्या पायाला पकडून तिचा मृतदेह बाहेर ओढला. आम्हाला न्याय हवा. दोषींना शिक्षा द्या. मुलीच्या वडिलांनी आरोप केलाय की, एका व्यक्तीने त्यांना बेदम मारलं आणि पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारेन असं धमकावलं. घटनेच्या वेळी मी बाजारात होतो. मला संध्याकाळी ७.३० च्या सुमारास समजलं. एका व्यक्तीने मला २० हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं परंतु मी ते स्वीकारलं नाही. पुजाऱ्याने त्या व्यक्तीला घटनेबद्दल सांगितलं असावं असं पीडित मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला.

आतापर्यंत चौघांना अटक

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुजाऱ्यासह चौघांना अटक केली आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, कायद्याखाली दोषींवर कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे. 

 

 

टॅग्स :Policeपोलिस